उरण दि 16(विठ्ठल ममताबादे )- रविवार दिनांक 15 मे 2022 रोजी मु. भेंडखळ, तालुका उरण, जिल्हा रायगड येथे अँटी करप्शन आणि क्राइम कंट्रोल क्लबची सभा संपन्न झाली. महाराष्ट्र अध्यक्ष सागर ठाकूर यांच्या अध्यक्षते खाली ही सभा संपन्न झाली. समाजामध्ये आज जे काही राजकीय वातावरण सुरू आहे.आणि राजकीय परिस्थिती मुळे सर्वसामान्य माणूस महागाई – बेरोजगारी मध्ये भरडला जाताना दिसत आहे. अशावेळी समाजामध्ये राजकीय हिंसा किंवा वाद घडू नयेत आणि आपण सारे भारतीय आहोत भारतीय म्हणूनच रहायला पाहिजे हे विचार त्यांनी उपस्थितांना पटवून दिले.
तर समाजामध्ये स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात सर्वच संघटना उभ्या राहतात मात्र पुरुषांवर सुद्धा कधीकधी अन्याय होताना दिसत असतात. पण अशा पीडित पुरुषांसोबत सुद्धा मागितल्यास मदतीचा हात देवून उभे राहू असे वक्तव्य त्यांनी केले. आज समाजामध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत पार्किंग, अनधिकृत प्रवासी वाहतूक त्याचबरोबर बेकायदेशीर जमीन विक्रीतून शेतकऱ्यांची होणारी घोर फसवणूक अशा विषयांवर यावेळी चर्चा झाली.
तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून वारकऱ्यांसाठी छोटेखानी कार्यक्रम करण्याच्या सूचना सर्व सदस्यांना देण्यात आल्या. समाजात चांगले कार्य करून जास्तीत जास्त गरजूंना मदत करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उरण तालुका अध्यक्ष विजय भोईर (भेंडखळ) यांनी केले. तर या कार्यक्रम प्रसंगी उरण प्रतिनिधी लिलेश्वर ठाकूर, किरण पाटील, दिपक भोईर, सतीश सोनलकर (सातारा) कुमारी मनीषा खरात ( उलवे नोड) तसेच अंबरनाथ विभागीय अध्यक्ष मनोहर पाटील, सदस्य उमेश साळुंखे, सदस्य चंदन मढवी, सदस्य किरण पाटील, सदस्य अशोक जाधव, सदस्य शशिकांत इटम (पालघर) इत्यादी सहकारी उपस्थित होते.
शेवटी सर्वांनी समाजामध्ये होणारी कोणतीही बेकायदेशीर घटना माहीत असताना लपवून न ठेवण्याचे आवाहन महाराष्ट्र अध्यक्ष सागर ठाकूर यांनी उपस्थित सर्वांना केले. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी नागरिकांनी या संस्थेत सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे . अधिक माहितीसाठी संपर्क साधा कु. मनिषा खरात ( 7219023687), विजय भोईर (9819836820), सागर ठाकुर (98927 70246)
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group