kamgaar-nete-suresh-patil-and-sudhir-gharat-reselection


उरण दि 23(विठ्ठल ममताबादे)- उरण तालुक्यातील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या मल्टीपर्पज हॉल जेएनपीटी टाऊनशिप येथे भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच पार पडले.



या अधिवेशनात जेएनपीटी चे कामगार नेते सुरेश पाटील यांची भारतीय पोर्ट आणि डॉक महासंघाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी दुसऱ्यांदा फेर निवड करून त्यांची राष्ट्रीय पोर्ट वेतन निश्चिती समितीवर सुद्धा निवड केली गेली. तसेच सुधीर घरत यांची राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून फेर निवड केली गेली. सुरेश पाटील व सुधीर घरत या दोन्ही कामगार नेत्यांच्या भारतीय पोर्ट आणि डॉक मजदूर महासंघाच्या राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाच्या पदांवर निवड झाल्याबद्दल कामगार वर्गातून त्यांचे विशेष अभिनंदन केले गेले.



भारतीय पोर्ट अँड डॉक मजदुर महासंघ ही राष्ट्रीय पातळीवरील पोर्ट आणि डॉक मध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी देशातील एक प्रमुख लढाऊ कामगार संघटना असून या संघटनेने नेहमी कामगारांच्या हिताचे रक्षण करून कामगारांना त्यांचे हक्क व सन्मान मिळवून दिला आहे.त्यामुळेच या संघटनेला देशभरातील प्रमुख बंदरात कामगारांचा मोठा पाठिंबा आहे.



या दोन दिवस चाललेल्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्दघाटन रवींद्र हिमते (राष्ट्रीय सचिव- भारतीय मजदूर संघ)यांच्या शुभहस्ते झाले तसेच उरणचे आमदार महेश बालदी यांनी स्वागताध्यक्ष म्हणून सर्व मान्यवर व देश पातळीवरून या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कामगार बंधू भगिनींचे स्वागत केले. तसेच प्रशांतदादा ठाकूर आमदार पनवेल विधानसभा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून त्यांनी या राष्ट्रीय अधिवेशनात मार्गदर्शन केले. तसेच चंद्रकांत अण्णा धुमाळ( प्रभारी- इंडस्ट्री आणि पोर्ट) यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.त्याचबरोबर अनिल ढुमणे (प्रदेशाध्यक्ष- भारतीय मजदूर संघ) यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.