Virendra Sehwag at Nagothane RaigadVirendra Sehwag at Nagothane Raigad

सेहवाग आणि नागोठण्यात क्रिकेट खेळायला? होय खरं आहे.

आता काही दिवसांतच IPL २०२० चा थरार सुरु होणार आहे. कोरोनामुळे आधीच सगळे क्रिकेट चाहते कंटाळले आहेत. परंतु आम्ही सांगत आहोत २००७ साली झालेल्या आपल्या रायगडमधील मॅचद्द्ल. तेव्हा क्रिकेट जवळच स्टेडियम फक्त वानखेडे जिथे अंतरराष्ट्रीय मॅच पाहायला रायगडकर जाऊ शकत होते. परंतु सर्वानाच स्टेडियमवर जायला मिळायचे असे नव्हते.

अशातच वीरेंद्र सेहवाग क्रिकेट जगतात नावाजलेला खेळाडू आपल्या बॅड पॅचमुळे भारतीय क्रिकेट संघाबाहेर होता. पुन्हा संघात स्थान मिळण्यासाठी तेव्हा IPL नव्हती आणि रणजी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली तरच भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन होणार होते.

डिसेंबर २००७ साली रिलायन्स क्रिकेट स्टेडियम नागोठणे येथे एकूण दोन रणजी क्रिकेट सामने खेळवले होते. महाराष्ट्र संघ विरुद्ध सौराष्ट्र आणि दिल्ली संघ ज्याकडून वीरेंद्र सेहवाग खेळणार होता.

रायगडकरसुद्धा रणजी सामना आणि त्यात सेहवाग येणार म्हणून सामना पाहायला उत्सुक होते. तेव्हा सोशल मीडिया किंवा स्मार्ट फोनचा काळ नव्हता त्यामुळे ज्या लोकांना समजले तेच फक्त मॅच पाहायला गेले होते.

क्रिकेट सामन्यात फक्त एकच डाव खेळणाऱ्या वीरेंद्र सेहवागला फक्त ४ धावांवर माघारी परतावे लागले त्यामुळे खास त्याची खेळी पाहायला आलेल्या चाहत्यांचा हिरमोड झाला. नंतरही स्टार खेळाडू येतील आणि आपल्या इथे मॅच पाहायला मिळेल अशी अशा बाळगून असलेल्या रायगडमधील क्रिकेट चाहत्यांना पुन्हा तसा योग जुळून नाही आला.

२०१६ विकेटकिपर पार्थिव पटेल नागोठणे येथे खेळायला आला होता आणि त्यासंदर्भात त्याने ट्विटहि केले होते.

परंतु अंतरराष्ट्रीय दर्जाचे चांगले क्रिकेट स्टेडियम रायगडमध्ये होऊन मोठे सामने खेळवले जावेत असे प्रत्येक क्रिकेट चाहत्यांची मागणी अजूनही स्वप्नवतच आहे.











error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.