robbery in mangaon city


उतेखोल/माणगांव, दि.२५ मे ( रविंद्र कुवेसकर )- माणगांवमध्ये दोन दिवसात अकरा चोऱ्या झाल्या आहेत. खांदाड, एकता नगर, अमित कॉम्प्लेक्स, आता कुणबी भवन हॉल जवळील विरेश्वर नगर परिसरात चोरी झाल्या आहेत. हे चोरटे रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत ज्या घरांना लॉक असत अशा घरांमध्ये चोरी करतात. बंद घरे शोधत हे चोरटे चोरी करताना आता CCTV मध्ये कैद झाले आहेत.



२४ मे च्या रात्री फोपलूनकर आइस फॅक्टरी बाजूला असणाऱ्या लक्ष्मण कांचन चंद्र बिल्डींगमधील घरात चोरी करायला गेले असता हे चोरटे CCTV मध्ये चित्रित झाले आहेत. याच कुणबी भवन हॉल जवळील विभागात हार्मनी कॉम्प्लेक्स सी विंग तसेच तेथीलच एका चाळीतील एक बंद रूम आणि निजामपूर रोड बाजारपेठ येथील तुलसी वृंदावन अपार्टमेंटमधील एक घर फोडण्यात आलं आहे.



चोरट्यांचे एका मागोमाग एक चोरी सत्र सुरूच आहे. बंद घर हेरून हत्याराने कडी कोयंडा तोडून हे चोर घरात असणारे पैसे दागिने यांच्यावर डल्ला मारतात. आधी झालेल्या चोऱ्यांचे पाहिले तरी याच पद्धतीत चोऱ्या झाल्या आहेत. एका शहरात एका मागोमाग एक एवढ्या चोऱ्या तशाच पद्धतीने होत असताना नागरिक मात्र आता चोरट्यांच्या दहशतीखाली दिसत आहेत.



एवढ्या चोऱ्या करून देखील पोलिस चोरट्यांना पकडू शकले नसल्याने नागरिकांमध्ये असणारी निराशा नागरिक साफ बोलून दाखवत आहेत. सोशल मिडिया वरती दक्षता म्हणून पोलिस प्रशासना कडून सतर्कतेचे आवाहन केल्याचा मेसेज फिरत आहे.

रात्रीच्या वेळेस माणगांव मध्ये होणाऱ्या चोरी घरफोडीच्या सत्राने नागरिकांत दहशत, चोरांचे सिसिटीव्ही फुटेज व्हायरल.

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.