बातम्या सांगण्याची खास शैली आणि भारदस्त आवाज तसेच २४ तास बातम्या देणाऱ्या वाहिन्यांचा जमाना येण्यापूर्वी एकेकाळी बातम्या देणारे दूरदर्शन हे एकमेव दृकश्राव्य माध्यम असताना प्रदीप भिडे यांनी वृत्तनिवेदनाच्या क्षेत्रामध्ये आपली खास अशी ओळख निर्माण केली होती. नमस्कार, आजच्या ठळक बातम्या, अशा भारदस्त आवाजात दूरदर्शनवरील बातमीपत्राची सुरुवात करणारे ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं आज निधन झालं.
संयमित व शांतपणे न चुकता सह्याद्री चॅनलवर बातमी सांगणारा कदाचित अखेरचा चेहरा हरवला असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
१९७२ मध्ये दूरदर्शनमध्ये प्रवेश केल्यानंतर १९७४ पासून त्यांनी वृत्तनिवेदनास सुरुवात केली होती. तेव्हापासून पुढची अनेक वर्षे त्यांनी दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदक म्हणून काम केले होते. त्यांनी राज्य आणि देशातील अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींवेळी केलेले वृत्तनिवेदन अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.
वयाच्या २१व्या वर्षी त्यांनी दूरदर्शनच्या वृत्तविभागात सुरुवात केली. तब्बल ३५ वर्षांचा दीर्घ अनुभव आणि ९० दशकातील बातमी पाहणाऱ्यांच्या आवडता निवेदक म्हणून त्यांनाच पसंती मिळायची. १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटांची मालिका झाल्यावर बातमी सांगायची जबाबदारी प्रदीप भिडे यांच्यावर आली होती परंतु परिस्थिती भीषण झालेली असताना अंधेरी ते वरळी ते स्वतः पायी गेले आणि आपले कर्तव्य पार पाडत बातमी दिली.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group