मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोनच मंत्री शिंदे-फडणवीस सरकारमध्ये असल्यानं त्यांच्यावर सतत टीका होत होती. मात्र, आता मंत्रिमंडळ विस्तार पार पडला असून यामध्ये शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
यामध्ये दीपक केसरकर, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील यांचा समावेश आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार शिंदे गटाच्या आमदारांनी बंड केल्यानंतर पडलं. त्यानंतर शिंदे गटाकडे एक-एक आमदार फुटून गेले. यावरुन या आमदारांना विशेष ऑफर म्हणजेच मंत्रीपदाची ऑफर दिल्याचंही बोलल्या गेलं. तेव्हापासून मंत्रीपदाची चर्चा आहे. कुणाला कोणतं मंत्रीपद मिळणार, कुणाला राज्यमंत्रीपद, कुणाला कॅबिनेट मंत्रीपद मिळणार, याचीची चर्चा रंगत होती. कुणाला मंत्रपद मिळालंय जाणून घ्या…
मंत्रिमंडळ विस्तार – शिंदे गटाचे कॅबिनेट मंत्री:
- संदिपान भूमरे
- तानाजी सावंत
- गुलाबराव पाटील
- दीपक केसरकर
- शंभुराजे देसाई
- दादा भुसे
- उदय सामंत
- अब्दुल सत्तार
- संजय राठोड
भाजपकडून या मंत्र्यांनी शपथ घेतली
1) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)
2) राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)
3) सुधीर मुनंगटीवार (Sudhir Mungantiwar)
4) गिरिष महाजन (Girish Mahajan)
5) सुरेश खाडे (Suresh Khade)
6) अतुल सावे (Atul Save)
7) मंगल प्रभात लोढा (MangalPrabhat Lodha)
8) रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan)
9) विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit)
विशेष म्हणजे, आज शपथ घेणारे १८ मंत्री हे सर्व कॅबिनेट मंत्री आहेत. तसेच १८ पैकी एकही महिला मंत्री नाही. तसेच रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे तिन्ही आमदार शिंदे गटात सामील होऊन सुद्धा एकाचीही वर्णी लागली नाही.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group