आज दिनांक १२/१०/२०२० रोजी रायगड जिल्हा वाहतूक विभागाकडून रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रामधील सर्व दुचाकी चालकांस वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन करण्यात आले.
कोवीड-१९ चा प्रादुर्भाव होत असल्याने शासनाने सामाजिक अंतर ठेवण्याबाबत आधीपासूनच सूचना दिलेली आहे. तसेच जिल्ह्यात मोटारसायकल अपघातसुद्धा वाढत असून अनेक दुचाकीस्वारांचा बळी गेला आहे.
रायगड पोलिसांतर्फे जिल्ह्यातील सर्व दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करावे याबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे तसेच दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान न केल्यास मोटार वाहन कायदा कलम १२९/१७७ प्रमाणे वाहतूक पोलिसांमार्फत कारवाई केली जाईल.
तसेच सामाजिक अंतर ठेवण्याबाबत शासनाचे आवाहन आणि इतर वेळी सुद्धा काही दुचाकीस्वार ट्रिपल सीट घेऊन वाहने चालवतात असे निदर्शनात आल्यामुळे अशा चालकांवरतीसुद्धा कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.
कोणीही दुचाकीस्वार विनाहेल्मेट आणि ट्रिपलसीट वाहन चालवणार नाहीत याबाबत सर्वांनी सादर आवाहनाचे काटेकोरपणे पालन करण्याचे रायगड जिल्हा वाहतूक विभागाकडून कळवण्यात आलेले आहे.
