narendra_modi_Office_OLX

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाराणसीतील कार्यालय OLX वरती विक्रीसाठी उपलब्ध झाले होते आणि ते पाहून ग्राहकांना धक्काच बसला. पंतप्रधानांवर आपले कार्यालय विक्रीसाठी काढण्याची वेळ आली याबद्दल आश्चर्य व्यक्त झाले.

हे वृत्त वाऱयासारखे पसरले आणि साहजिकच वाराणसीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अमित पाठक यांची झोप उडाली. व याची सखोल चौकशी झाली. त्यात एका उनाड चौकडीने हे कृत्य केल्याचे समोर आले आणि पोलिसांनी चौघांचीही गचांडी पकडली.

वाराणसी हा मोदींचा मतदारसंघ आहे जिथे जवाहर नगरमध्ये त्यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. त्या कार्यालयाची छायाचित्रे काढून या चौघांनी ती OLX वरती अपलोड केली होती.

हे कार्यालय विक्रीसाठी उपलब्ध असल्याची जाहिरात केली गेली. तपास पूर्ण करून ती जाहिरात OLX वरून काढून टाकण्यात आली आहे.

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.