GDP growth rate IndiaGDP growth rate India

कोरोना जगभर थैमान घालत असताना भारतात मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाला आणि कालच आलेल्या GDP रिपोर्टनुसार फक्त चीन plus असून बाकीचे सर्व बलाढ्य देशांचा रेट निगेटिव्ह असून भारताचा पहिला क्रमांक आहे. परंतु याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामान्य माणसांच्या जीवनावरती भविष्यात काय परिणाम होऊ शकतात ते पाहूया.

लॉकडाऊनमध्ये सर्वच उद्योग जवळपास ठप्पच झाले होते. अजूनही बऱ्याच गोष्टी बंदच आहेत. त्यामुळे सरकारलासुद्धा महसूल जास्त प्रमाणात उपलब्ध होत नाही आणि कामे बंद असल्यामुळे बेरोजगारी वाढत चालली आहे.

जर GDP मध्ये वाढ होत असेल तर देशाच्या विकासाच्या दृष्टीने ती चांगली गोष्ट असते परंतु घट होत असल्यास साक्षरता,गरिबी, बेरोजगारी, आरोग्यसेवा यावरती परिणाम होऊन सामाजिक आणि आर्थिकबाबींत वाईट परिणाम होत असतात. थोडक्यात सांगायचं झाल्यास GDP मध्ये वाढहोत असल्यास सरकारकडे मुबलक पैसा असतो जो विविध सेवांकरिता वापरण्यास मिळतो. परंतु जर GDP मध्ये घट होत असल्यास सरकारकडे मुबलक पैसे नसतात त्यामुळे सरकार देशाच्या विकासासाठी लागणाऱ्या या विविध सेवांसाठीच्या पैश्यांमध्ये कपात करते.

जीडीपीमध्ये वेगाने घसरण झाली तर सामान्य माणसाच्या जगण्यात काय फरक पडेल?

जीडीपीमध्ये घसरण म्हणजे अर्थव्यवस्था मंदावत असते आणि बेरोजगारीचा धोका वाढत जात असतो. जर उत्पन्न कमी होत असेल तर आपण खर्च कमी करून बचत करण्याकडे भर देत असतो. तसंच कंपन्यांचंदेखील असतं. जर उत्पादन कमी होत असेल तर कंपन्यासुद्धा बचतीकडे जास्त भर देत असतात जेणेकरून दिवाळखोरी होऊ नये. अशा काळात सरकारसुद्धा कमी प्रमाणात नोकरभरती करत असते.

औद्योगिक उत्पादने कमी होतात, व्याजदर कमी होतात आणि सामान्य माणूस बचतीवरती भर देत असतो त्यामुळे उत्पादनांची मागणी कमी होते. त्यामुळे गुंतवणूकदारसुद्धा कमी गुंतवणूक करत असतात.

CMI यांच्या माहितीनुसार या फक्त जुलै महिन्यात तब्बल ५० लाख लोकांची नोकरी गेली आहे. कोरोना संकट लवकरच जाऊन मंदीचं सावट दूर होईल आणि भारतीय अर्थव्यवस्था सुरळीत होऊन जनजीवन सुरळीत चालेल अशी अपॆक्षा बाळगूया.

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.