ऐन सणासुदीत सामान्यांना महागाईचे चटके बसणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे. आता नॅचरल गॅसच्या किंमतीत 62 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. (Natural Gas Price) तसेच घरगुती गॅस सिलिंडरसह CNG, PNG महागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामान्यांना पुन्हा एकदा महागाईचे चटके बसण्याची शक्यता आहे.
नॅचरल गॅसच्या किंमतीत 62 टक्क्यांनी वाढ झाल्याने त्याचा परिणाम महागाईवर होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढल्याने घरगुती गॅस सिलिंडरचे भाव वाढण्याची चिन्हे आहेत. ही दरवाढ 60 ते 70 टक्के इतकी असू शकते.
याशिवाय CNGचे दरही वाढू शकतात. CNGचे दर किलोमागे 4 ते 5 रूपयांनी वाढू शकतात. सध्या मुंबईत CNGचा दर प्रतिकिलो 51 रूपये 98 पैसे इतका आहे. हा दर 55 रूपये होऊ शकतो.
केंद्र सरकारने गुरुवारी नैसर्गिक वायू (NG) च्या किंमतीत 62 टक्के वाढ केली आहे. या गॅसचा वापर खत, वीजनिर्मिती, सीएनजीच्या स्वरूपात वाहन इंधन आणि स्वयंपाकासाठी गॅस म्हणून केला जातो. एप्रिल 2019 नंतर किमतीतील ही पहिली वाढ आहे. प्रमाण मानल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वाढल्याने गॅसचे दर वाढले आहेत. त्यामुळे गॅस दरवाढ करण्यात आली आहे. नवीन दर 1 ऑक्टोबरपासून लागू होतील.

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group