बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात तीन दिवस सर्वदूर पावसाची शक्यता हवामान विभागाने आज एक डिसेंबर रोजी सकाळी वर्तवली आहे. राज्यात प्रामुख्याने पालघर, मुंबई नाशिक, धुळे, नंदुरबार, सांगली या भागात मुसळधार तर उर्वरित राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वत्र ढग दाटून आले असून सर्वत्र धुक्याची चादर पहावयास मिळत आहे.
त्यात बहुतांश भागात रिमझिम पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळित झाले. चाकरमानी वर्गाची अचानक आलेल्या पावसाने चांगलीच पंचाईत झाली. रेनकोट, छत्री, स्वेटर घालूनच लोक घराबाहेर बाहेर पडले आहेत. पुणे शहरात पहाटे पासूनच संततधार पावसाला सुरुवात झाली. धुके खूप खाली आल्याने वातावरण पावसाळी झाले आहे.
दरम्यान, मुंबई शहरातही वाऱ्यासह पाऊस आहे. ढगाळ वातावरणामुळे सकाळच्या वेळीही अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. संथ गतीने वाहतूक सुरु आहे. रायगड जिल्ह्यातील काही भागांत सकाळी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. तसेच माणगांव परिसरात गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group