रायगडमध्ये दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. कालच्या रिपोर्टनुसार रायगडमध्ये करोना पॉझिटिव्ह असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1 हजार 956, पनवेल ग्रामीण-753, उरण-253, खालापूर-282, कर्जत-240, पेण-499, अलिबाग-927, मुरुड-63, माणगाव-264, तळा-48, रोहा-388, सुधागड-91, श्रीवर्धन-52, म्हसळा-20, महाड-220, पोलादपूर-42 अशी एकूण 6 हजार 098 झाली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात 27 हजार 573 जणांनी केली करोनावर मात केली आहे. आणि दुर्दैवाने मृत पावलेल्या रुग्णांची संख्या: पनवेल मनपा-328, पनवेल ग्रामीण-81, उरण-74, खालापूर-83, कर्जत-46, पेण-72, अलिबाग-71, मुरुड-21, माणगाव-22, तळा-4, रोहा-43, सुधागाड-16, श्रीवर्धन-17, म्हसळा-9, महाड-49, पोलादपूर-13 असे एकूण 949 नागरिक मृत पावले आहेत.
१० सप्टेंबर २०२० एकाच दिवसात रायगडमध्ये एकूण २० जण कोरोनामुळे मृत पावले.
अशातच सोशल मीडियावरती रायगड जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन होणार असा चुकीचा संदेश व्हायरल होत असून भीतीचे वातावरण निर्माण होत आहे, यालाच अनुसरून “रायगडमध्ये पुन्हा लॉकडाऊन होणार नाही” असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले असून अफवांना पूर्णविराम दिला आहे.

जिल्हाबंदी उठली आहे आणि ई-पास बंधनकारक नसला तरी कामाव्यतिरिक्त नागरिकांनी बाहेर पडू नये. ज्यांना कोरोना लक्षणे वाटत असतील त्यांनी त्वरित टेस्ट करून घ्यावी.
अफवांवर विश्वास ठेवू नये.