Aditya thackray at sunil tatkare house


शिवसेनेचे युवा नेते व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे येणार म्हणून रायगड जिल्ह्यातील शिवसैनिकांनी जंगी तयारी केली होती. जागोजागी स्वागत कमानी उभारल्या होत्या. एक मोठी सभादेखील झाली. मात्र हे सगळं झाल्यानंतर आदित्य ठाकरे सुतारवाडीला तटकरे यांच्याकडे पाहुणचार घेण्यासाठी गेले.



कोकणदौरा दरम्यान शिवसेनेचे युवा नेते, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे हे आज (30 मार्च) रायगडात आले होते. महाड आणि माणगाव येथे विविध कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी नेते सुभाष देसाई, मंत्री उदय सामंत तसेच शिवसेनेचे तिन्ही आमदार उपस्थित होते. बर्‍याच दिवसांनी रायगडात भगवेमय वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे शिवसैनिक जोरात होते.



मात्र जेव्हा आदित्य ठाकरे हे सुतारवाडीला जाणार असल्याचे समजले, तेव्हा शिवसेनेच्या नेत्यांचे हातपाय गळाले. अनिल परब वगळता एकही आमदार त्यांच्यासोबत सुतारवाडी पर्यंत गेला नाही. काही वेळेपूर्वी उत्साहात असलेले शिवसैनिक निराश झाले. सुतारवाडीला गेल्यास शिवसैनिक नाराज होतील, असे सेना नेते सुभाष देसाई यांनी आदित्य ठाकरे यांना सांगण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.



आज जेव्हा आदित्य ठाकरे रायगडात आले, तेव्हा ते या विषयावर काहीतरी बोलतील, अशी अपेक्षा आमदारांसह शिवसैनिकांना होती. मात्र आदित्य यांनी या वादावर बोलण्याचे टाळल्याचे दिसून आले. सभा आटोपून शवसैनिकांच्या गर्दीतून वाट काढत ते मार्गस्थ झाले. यानंतर आदित्य ठाकरे हे सुतारवाडीला तटकरे यांच्याकडे गेल्याची माहिती फिरु लागली आणि शिवसैनिकांना धक्काच बसला.

आदित्य ठाकरे पुण्याला रवाना होणार होते त्यामुळे ते वाटेत जाताना तटकरे यांच्या निवास्थानी थांबले असल्याची माहिती मिळते.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.