वीज वितरण कंपनीने बुधवारी रात्री अचानक वीज पुरवठा खंडीत करुन रायगडकरांना जोरदार शॉक दिला आहे. सुरुवातीला कोणाच्याच काही लक्षात आले नाही; मात्र थोड्या वेळाने लोडशेडींग असल्याचे समजले आणि आठ तासांचे ‘चक्री भारनियमन’ करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांच्याच पोटात गोळा आला आहे. लोडशेडींगचे वेळापत्रकाबाबत अद्याप नियोजन झालेले नाही.
कोळसा टंचाईमुळे वीजनिर्मिती वाढवण्यास मर्यादा असल्याने राज्यात ठिकठिकाणी भारनियमनाचा इशारा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.
उन्हाचे चटके वाढू लागले असतानाच राज्याची विजेची मागणी 30 हजार मेगावॅटपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मागणी आणि पुरवठा यांच्यात ताळमेळ बसत नसल्यामुळे राज्यात पुन्हा भारनियमनाचे संकट उभे ठाकले आहे.
2014 च्या आधी रायगडसह राज्याने भारनियमन अनुभवले आहे. कधी दोन तास, कधी चार तास वीज बंद केली जायची. अंधाराने भरलेला हा काळ अनुभवला आहे. त्यामुळे आता परत भारनियमाचे संकट घोंघावत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यात अचानक वीजपुरवठा खंडीत करण्यात आल्यामुळे सुरुवातीला कोणालाच काही माहिती मिळाली नाही. वीज का खंडीत झाली आहे किंवा वीज पुन्हा कधी येणार याबाबतची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group