उरण दि 16 (विठ्ठल ममताबादे): नाट्य प्रशिक्षणातून बाळ गोपाळांचे व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्यासाठी जेष्ठ दिग्दर्शक विनायक सावर्डेकर आणि इतर मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली उरण मध्ये लहान मुलांसाठी प्रथमच रत्नवेध उरण या संस्थेतर्फे दिनांक 8 मे 2022 ते 22 मे 2022 दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत बालनाट्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात वाचन, भाव, भाषा, उच्चार, अभिनय याची ओळख तसेच रंग मंचावरील वावर, वापर तसेच योग्य माहिती, रंगभूषा व वेशभूषा याची ओळख, व्यक्तिमत्व विकास, योग्य मान्यवरांमार्फत योग्य मार्गदर्शन देण्यात येणार आहे. प्रत्येक शिबिरार्थीना संस्थेचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी आनंद ठक्कर – 8879045007, सुषमा काळे -8291446203, प्रतीक्षा जोशी -8097801168, रामचंद्र निपाणीकर -9167603550 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावे असे आवाहन रत्नवेध उरण या संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group