mgm hospital vashi


उरण दि 15(विठ्ठल ममताबादे )- मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण व एम. जी. एम. हॉस्पिटल वाशी (नवी मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबीर रविवार दिनांक 15/5/2022 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत उरण नगरपरिषद शाळा , पेन्शनस पार्क , एनएमएमटी बस स्टँड च्या समोर उरण शहर येथे आयोजित करण्यात आले होते. या महा आरोग्य शिबिराला जनतेचा, नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.



सदर आरोग्य शिबिरात जनरल तपासणी , दंत तपासणी,डोळे तपासणी ,रक्तदाब तपासणी,हाडांचे आजार तपासणी,मधुमेह रक्त तपासणी,स्त्रीरोग तपासणी , ई . सी. जी आदी तपासण्या मोफत करण्यात आले .तसेच ठराविक चष्म्यावर 50% सवलत देण्यात आली. उरण तालुक्यातील गरजू नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.यावेळी उरण मधील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संग्राम तोगरे यांनी गोळ्या औषधे मोफत दान दिली.



आमदार महेशशेठ बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिराचे उद्घाटन नगरसेवक तथा भाजपा तालुका अध्यक्ष रवीशेठ भोईर यांनी केले. यावेळी नगरसेवक कौशिक शेठ शहा , माजी नगराध्यक्ष सायली ताई म्हात्रे, एमजीएम मधील डॉक्टर सुभाष जाधव आणि त्यांची टीम,मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विशाल विजय पाटेकर आणि त्यांचे सभासद – बादल म्हात्रे , सनी पाटील, विकास पाटेकर , प्रणय अमृते, किशोर पाटेकर ,गणेश पाटेकर , गिरीष पाटेकर ,शलाका पाटेकर , पुनम पाटेकर , जोस्त्ना पाटेकर , सायली पाटेकर , कल्पिता पाटेकर, शौनक समेळ, तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यकर्ते सुमेध पाटील , योगराज करंगुटकर , मधुरा करंगुटकर , प्रेरणा पाटील , कौस्तुभ कोंडीलकर आदींनी विशेष मेहनत घेतली.




आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.