उतेखोल/माणगांव, दि. २५ जुन (रविंद्र कुवेसकर)- माणगांव पोलीस ठाणे हद्दीत मौजे कडापुर गावचे हद्दीत जंगल भागात व्हेल माशाचे उलटीची तस्करी करून विकत असताना वहानासह मिळुन आल्याने एका महिलेसह पाच पुरुष आरोपी यांना एकुण ५,८२,००,०००/- किंमतीच्या मुद्देमालासह माणगांव पोलीस ठाण्याकडून अटक करण्यात आली आहे.



आज दिनांक २५ जुन २०२२ रोजी दुपारी १४.३० वाजताचे सुमारास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, रायगड पाचाड रोडला मौजे कडापुर गावचे हद्दीत व्हेल माशाचे उलटीची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्याने रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, माणगांवचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शना खाली सपोनि. नितीन मोहिते, सपोनि. लहांगे, पोसई. गायकवाड, पोसई. आघाव, सहाय्यक फौजदार जितेंद्र वाटवे, पोहवा/७८६ प्रशांत पाटील, पोहवा/७९३ दर्शन दोडकुलकर, पोहवा/७०९ कोळेकर, मपोना/१९४ धनावडे, मपोना/६४ कोंजे, मपोना/७६ जाधव, पोना/१६२४ मिलींद खिरिट, पोशि/१९०५ रामनाथ डोईफोडे, पोशि/१३६१ श्याम शिंदे, पोशि/२२३८ शिवाजी मिसाळ, पोशि/२२३८ धोंडीबा गिते, पोशि/१९५१ गोविंद तलवारे, पोशि/३९९ माटे, पोशि/४९१ पोंधे, वनरक्षक अक्षय मोरे असे सदर ठिकाणी रवाना होऊन त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला.



दुपारी १५.३० वाजण्याचे सुमारास त्या ठिकाणी एक इसम एका पांढर्‍या रंगाचे कार जवळ असलेल्या झाडाजवळ अर्धवट रेनकोट घातलेला संशयास्पद स्थितीत त्याचेकडे असलेल्या प्लॅस्टिकची गोणी लपवीत असताना मिळून आला. त्यास आमचेपैकी पोना/१६२४ खिरिट यांनी जागीच पकडून त्याचे ताब्यात मिळून आलेल्या प्लॅस्टिकच्या गोणीत काय आहे याची विचारपूस केली असता, त्यात व्हेल माशाची उलटी/वांतीचा एक मोठ्या आकाराचा तुकडा मिळून आला असुन तो व्हेल माशाची उलटी/वांतीचा एक मोठ्या आकाराचा तुकडा असल्याची खात्री झाल्याने, त्यास त्याचे नाव गांव विचारता त्याने त्याचे नाव दिनेश उमाजी भोनकर, वय ४२ वर्षे, व्यवसाय चालक, राहणार सुरव तर्फे तळे, तालुका माणगांव रायगड असे असल्याचे सांगितले.



त्यास हे व्हेल माशाचे उलटीचा/वांतीचा तुकडा कशाकरीता आणला आहे याबद्दल विचारणा केली असता, त्याने तो विक्री करण्याकरिता आणल्याचे सांगितले. त्याचे सोबत कोणकोण साथीदार आहेत याबाबत विचारणा केली असता, त्याने माझे सोबत गाडीमध्ये १] वैभव बाबुराव कदम, २] योगिता वैभव कदम, दोन्ही राहणार-१०४, गायत्री व्हिजन, नवीन पनवेल, ३] दत्तात्रेय मोहन शेट्ट्ये राहणार दुसरी फणसवाडी दादी शेट अग्यारी लेन चिराबाजार रोड गिरगांव मुंबई नंबर ०२, ४] सुरेश पंढरीनाथ नलगे राहणार येहुरगाव पाटोणापाडा पोखरण रोड, नंबर १ ठाणे-पश्चिम आणि ५] सुर्यकांत वसंत पवार, राहणार फ्लॅट नंबर १०९, मंगलमुर्ती अपार्टमेंट, नवघर आरडी सेक्टर, १६ घणसोली नवीमुंबई असे लोक समोर असलेल्या हुंदाई कंपनीची ग्रँड आय १० कार क्रमांक एमएच. ०२ सी.एच. ९७१७ या गाडीत बसलेले आहेत गाडीत बसलेल्या इसमांकडे सदर व्हेल माशाचे उलटी/वांती बाबत विचारणा केली असता, त्यांनी आम्ही सदरची उलटी ही विक्री करण्यासाठी आणली असल्याचे पंचांसमक्ष सांगितले आहे.

तसेच सदर व्हेल माशाची उलटी/वांती ही कोणाकडून आणली, याबाबत विचारणा केली असता, त्याने दिनेश शेडगे राहणार रायगडरोड, तालुका महाड जिल्हा रायगड असे असल्याचे सांगुन, तो कोठे आहे याबाबत विचारणा करता तो पाठीमागुन येत आहे असे सांगितले. त्याच्या ताब्यात मिळून आलेल्या मालाची किंमत ५,८०,०००००/- (पाच कोटी ऐंशी लाख रुपये मात्र), दिनेश उमाजी भोनकर, वय ४२ वर्ष, व्यवसाय चालक राहणार सुरव तर्फे तळे तालुका माणगाव रायगड याचे ताब्यात मिळुन आलेल्या पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिक गोणी मध्ये खोलून पहाता त्यामध्ये प्लॅस्टिक पेपर व पेपराच्या कागदात गुंडाळलेली असुन त्यामध्ये व्हेल माशाची उलटी/वांती अंबरग्रिस (Ambergris) याचा एक मोठ्या आकाराचा तुकडा असा चॉकलेटी रंगाचा तुकडा असुन वजन काट्यावर त्याचे वजन केले असता त्याचे वजन ०५ किलो ८०० ग्रॅम व एक हुंदाई कंपनीची ग्रँड आय १० कार क्रमांक एम.एच. ०२ सी.एच. ९७१७ असा एकुण ५,८२,००,०००/- किंमतीचा (पाच कोटी बॅऐंशी लाख मात्र) मुद्देमाल मिळून आला असुन एका महिलेसह एकूण सहा आरोपीत यांना अटक करण्यात आली असुन सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक लहांगे हे करीत आहेत.

व्हेल माशाची ही उलटी म्हणजे एक दगडासारखा पदार्थ असतो. त्याला अ‍ॅम्बरग्रीस(Ambergris) असं म्हणतात. व्हेल माशाने तो तोंडातून बाहेर फेकला की तो वाहत किनाऱ्यावर येतो. या गोळ्य़ाला जागतिक बाजारपेठेमध्ये मोठी किंमत मिळते. त्याला पांढुरका पिवळा रंग असतो. या गोळ्याला इतकी किंमत का असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर म्हणजे, सुगंध. या दगडासारख्या गोळ्याला कस्तुरीसारखा गोडसर वास असतो. त्यामुळे त्याचा वापर उच्च प्रतीच्या अत्तराच्या (perfume) निर्मितीसाठी केला जातो. मात्र आजही ही उलटी म्हणजे नक्की काय याचा विचार संशोधक करत आहेत.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.