diet importance


उरण दि 3(विठ्ठल ममताबादे )- आपण जे आहार घेतो त्यातून आपले शरीर निरोगी राहत असते.निरोगी शरीरासाठी डायट महत्त्वाचे आहे. कोणता पदार्थ कधी खावा ? कोणत्या वेळेत खावा ? हे प्रत्येकाला माहीत असणे गरजेचे आहे. मानवी जीवनात डाएटचे महत्व अनन्यसाधारण आहे असे मत दिल्ली कॅपिटल या आयपीएल क्रिकेट टीमच्या आहार तज्ञ सायली नाईक यांनी व्यक्त केले.



भेंडखळ क्रिकेट अकॅडमी तर्फे उरण तालुक्यातील पाणदिवे येथील पुंडलिक रामा पाटील इंग्लिश हायस्कूल येथे क्रिकेटच्या विदयार्थ्यांसाठी योग्य आहार व आहाराच्या योग्य वेळा याबाबत मार्गदर्शनपर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सायली नाईक यांनी विदयार्थ्यांना व उपस्थित पालक वर्गांना मार्गदर्शन केले. नेहमीच्या जेवणातील आहार व त्या आहारातून मिळणारे जीवनसत्व आयर्न , प्रोटिन, कल्शियम, फायबर, पोषक द्रव्ये कोणकोणती आहेत ? कोणत्या पदार्थापासून किती कॅलरिज मिळतात ? आदी आहाराशी संबंधित विविध विषयावर सायली नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी आणि पालकांनी विविध शंका, समस्या विचारले असता आपल्या मार्गदर्शनातून प्रश्नांची, समस्यांची उत्तरे सायली नाईक यांनी उपास्थित पालक, विद्यार्थ्यांना दिली. या मार्गदर्शन शिबिरातून विदयार्थी पालकांना योग्य आहार कोणता असतो, आहार कोणत्या वेळेत घ्यावा आदि गोष्टींची सविस्तर माहिती मिळाली.



यावेळी अस्थीरोग तज्ञ डॉ भूषण पाटील, सामाजिक कार्यकर्ते रोहिदास पाटील, भेंडखळ क्रिकेट अकॅडेमीचे अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष मनोज भगत, हेड कोच नयन कट्टा, असिस्टंट कोच शरद म्हात्रे तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.भेंडखळ क्रिकेट अकॅडमी तर्फे गेल्या आठवडाभरात उच्च दर्जाचे फिटनेस ट्रेनर व आहारतज्ञ आणून अकादमीच्या खेळाडूंसाठी उच्च दर्चाचे मार्गदर्शन केल्या बद्दल भेंडखळ क्रिकेट अकॅडमीचे सर्वत्र कौतुक होत आहे.



गेल्या मोसमामध्ये भेंडखळ क्रिकेट अकॅडमीने हेड कोच नयन कट्टा यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यात विविध टुर्नामेंट मध्ये सहा ठिकाणी फायनल मध्ये प्रवेश केला. व तीन ठिकाणी विजेतेपद पकावल्या बद्धल संपूर्ण जिल्ह्यात त्यांचं कौतुक होत आहे. भेंडखळ क्रिकेट अकॅडमीला भेंडखळ ग्रामपंचायतचे सहकार्य नेहमीच लाभत असते. त्यामुळे भेंडखळ ग्रामपंचायत, पुंडलिक रामा पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य प्रकाश पाटील व आहार तज्ञ सायली नाईक यांचे भेंडखळ क्रिकेट अकॅडेमी तर्फे आभार मानण्यात आले. व कार्यक्रमाचा समारोप झाला.सदर कार्यक्रम उत्तम प्रतिसादासह उत्साहात संपन्न झाला.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.