chirner to vahal saibaba dindi on occasion of gurupaurnima


उरण दि 8 (विठ्ठल ममताबादे)- बुधवार 13 जुलै 2022 रोजी हिंदू धर्मातील प्रसिद्ध सणापैकी एक असलेले गुरुपौर्णिमा हा सण आहे. या गुरुपौर्णिमा सणाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याहि वर्षी ॐ साई सेवा मंडळ चिरनेर तर्फे श्री महागणपती मंदिर चिरनेर (उरण )ते श्री साई मंदिर वहाळ (पनवेल) दरम्यान श्री साईबाबाची पायी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.



सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री महागणपती मंदिर चिरनेर येथून वारकरी दिंडी पदयात्रा बुधवार दि 13/7/2022 रोजी दुपारी 12 वा. श्रीची आरती करून साई मंदिर वहाळ येथे प्रस्थान होणार आहे.यंदाचे हे पदयात्रेचे 7 वे वर्ष आहे.



सदर पदयात्रा यशस्वी करण्यासाठी गजानन फुंडेकर (कार्याध्यक्ष),नितीन नारंगीकर ( उपाध्यक्ष), अमित मुंबईकर (अध्यक्ष),संतोष चिर्लेकर (सचिव),प्रसाद पाटील (खजिनदार),बबन ठाकूर (सल्लागार),गजानन म्हात्रे (सल्लागार),हरिश्चंद्र मोकल (सल्लागार),रमेश म्हात्रे (सल्लागार)यांच्यासह ॐ साई सेवा मंडळ चिरनेरचे सर्व पदाधिकारी सदस्य विशेष मेहनत घेत आहेत.



तरी सर्व साईभक्तांनी दिंडी मध्ये सहभागी होउन श्री साईचा कृपाशिर्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी, दिंडी मध्ये सहभागी होण्यासाठी अध्यक्ष अमित मुंबईकर फोन नंबर 8452937382, उपाध्यक्ष नितिन नारंगीकर 8454937966 यांच्याशी संपर्क साधावे.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.