MahajobsMahajobs

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज एमआयडीसीच्या महाजॉब्स पोर्टलचे http://mahajobs.maharashtra.gov.in ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात बरेचसे परप्रांतीय कामगार आपल्या राज्यात परतले.

त्यामुळे राज्यातील उद्योगांना कामगारांचा तुटवडा भासू नये आणि स्थानिक लोकांना रोजगार मिळावा हा मुख्य हेतू ठेवून “Mahajobs” हे वेबपोर्टल तयार केले.

राज्यातील मराठी तरुणांना रोजगार मिळावा या हेतूने हे वेब पोर्टल सुरु करण्यात आलेले आहे. रोजगाराच्या प्रतीक्षेत असणाऱ्या तसेच नोकरीत बदल करणाऱ्या इच्छुकांनी या वेबपोर्टलवरती नोकरी संदर्भातील माहिती भरायची आहे.

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.