pen-gansesh-murtikar-meet-raj-thackeray

लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यावसायिक आणि विविध क्षेत्रातले मान्यवर आपल्या व्यथा घेऊन राज ठाकरे यांच्याकडे जात आहेत. आज बुधवार ०७ ऑक्टोबर २०२० रोजी पेणचे गणेश मूर्तिकार यांनीसुद्धा राज ठाकरे यांची भेट घेतली.

पेणच्या गणेशमूर्तीकारांचे एक शिष्टमंडळ आज राज ठाकरे यांना भेटले. केंद्र सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी घातल्यामुळे मूर्ती घडवणे कठीण जात असल्याची व्यथा त्यांनी राज ठाकरे यांच्यासमोर मंडळी.

परंतु राज ठाकरे यांनी यात राजकारणाचा विचार न करता पर्यावरणपूरक विचार मांडले. प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे पर्यावरणाला धोका वाढतो त्यामुळे शाडूच्या मूर्ती आवश्यक आहेत असे ते म्हणाले.

त्या चर्चेतील काही महत्त्वाचे मुद्दे :

• गणेशोत्सव साजरा करू नका, असं कोणतंच सरकार तुम्हाला सांगू शकत नाही. पण इतक्या श्रद्धेने आपण घरी गणेश मूर्ती आणतो, मनोभावे पूजन करतो परंतु विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी मूर्ती न विरघळल्यामुळे जी विटंबना होते ती पाहवत नाही. त्यामुळे मूर्तिकारांना माझं आवाहन आहे की, तुम्हाला आता पर्यावरण पूरक पर्याय शोधण्याची गरज आहे.

• जर तुम्ही मूर्त्यांच्याबाबतीत पर्यावरणपूरक पर्याय समोर आणला नाहीत तर त्याला परदेशी पर्याय उपलब्ध होईल आणि लोकं त्या पर्यायांकडे वळतील. मग तुमची समस्या आणखीनच वाढू शकते.

• मूर्तिकारांचे काही प्रतिनिधी आणि माझे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील सहकारी मिळून एक शिष्टमंडळ घेऊन महाराष्ट्र सरकारच्या संबंधित खात्याला भेटा. मी स्वतः महाराष्ट्र शासनाशी विसर्जनाच्या पर्यायी व्यवस्थांबद्दल, मूर्तिकार कारखानदारांच्या थकलेल्या कर्जाबद्दल बोलेन दरम्यान तुम्हीही आता पर्यावरणपूरक पर्याया उभा करा.

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.