aniket tatkare birthday 15 october

आपण आज अनिकेत तटकरे यांना आमदार म्हणून ओळखतो. परंतु राजकारणाव्यतिरिक्त स्थानिक पातळीवरती अनेक समाजकारणाच्या गोष्टी आजही ते न चुकता करत आहेत.

मे २०१८ साली विधान परिषदेच्या कोंकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनिकेत तटकरे यांनी एकूण ९३८ मतांपैकी ६२० मते मिळून विजय संपादन केला. त्यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हापरिषद सदस्य व पंचायत समिती सभापतींनी मतदान करून श्री. अनिकेत तटकरे यांना विजयी केले.

आमदार किंवा कोणत्या पद नसतानाही सुरुवातीच्या काळापासून श्रीवर्धन, रोहा विभागात सतत कामांचा पाठपुरावा, योजना आणि स्थानिक पातळीवरती युवकांना सोबत घेऊन जनतेची कामे सुरु ठेवली. आजही श्रीवर्धनमध्ये विकासकामांसोबत व्यक्तिशः ऋणानुबंध कायम असून लोक हक्काने आपल्या मागण्या आणि प्रस्ताव त्यांच्याजवळ घेऊन जातात. आश्वासन न देता पाठपुरावा करून ते कामे पूर्ण करतात.

सत्यश्री फाऊंडेशनद्वारे स्थानिक कलाकारांना वाव मिळावा म्हणून जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत नृत्य आणि इतर प्रकारचे कार्यक्रम व महोत्सव सुरु केले. जेणेकरून कलागुणांना वाव मिळेल आणि जनतेलाही आपल्यातील कलाकारांची कला पाहायला मिळावी म्हणून अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. कार्यक्रमाला लागणारे साहित्य, मंडप, स्टेज तसेच फोटो व व्हिडिओग्राफीसाठीसुद्धा स्थानिक लोकांना काम देऊन त्यांच्यावरती विश्वास दाखवून अनेक कार्यक्रम यशस्वी पूर्ण केले.

मागील वर्षी रोहा येथे ६६वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे अचूक आयोजन करून त्यांनी नेतृत्व आणि योग्य व्यवस्थापनाद्वारे रायगडच्या जनतेला प्रत्यक्ष देशपातळीवरील खेळाडूंसहित मॅटवरील कब्बडी सामने दाखवण्याचे कार्य केले. तरुणवर्गाला उत्साह वाढला आणि आपल्या मातीतला खेळ खेळण्यास वाढ झाली. उदयोन्मुख खेळाडू तयार होताना आपल्याला दिसत आहेत.

National Kabaddi Roha 2019

फेब्रुवारी २०२० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कै.द.ग.तटकरे रंगमंच, म्हाडा ग्राउंड रोहा येथे अनिकेत तटकरे यांनी रायगडच्या जनतेला शिवपुत्र संभाजी महानाट्य तसेच शिवकालीन गाव, शिवनेरी व पन्हाळा किल्ल्याची प्रतिकृती उभारून जणू परत इतिहासात नेले. स्वतः खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराज यांची भूमिका करून इतिहास जनतेच्या घरोघरी आणि मनोमनी पोहोचवला.

शेतीविषयक गोष्टींमध्ये प्रचंड आवड असल्याने ते स्वतः दरवर्षी शेतात भात लावणी करतात आणि इतर प्रकारच्या फुल-झाडांच्या शेतीतही आवडीने लक्ष देतात. त्यांच्या दोन्ही मुलांना शेतीची आवड असून तेही आपल्या वडिलांसोबत न चुकता शेतीच्या कामात मदत करतात.

हल्लीचा काळ कोरोनाचा असल्यामुळे ते स्वतः योग्यती खबरदारी घेऊन जनसेवा करत आहेत. सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानतर्फे अनिकेत तटकरे यांनी नेतृत्व करून जनतेचे आरोग्य सुरक्षित राहावे म्हणून तब्बल २५००० मास्क वाटप केले, अनेक भाग निर्जंतुकीकरण केले. दिलेला शब्द एक महिन्यात पूर्ण करून खेडशहराला ऍम्ब्युलन्स मिळवून दिली.

निसर्ग वादळात जागोजागी जाऊन जनतेची विचारपूस आणि नुकसान भरपाई मिळवून देण्यास सततचा पाठपुरवठा केला. जून महिन्यात तळा तालुक्यातील महागांव गावासारख्या दुर्गम भागात बांधकाम सुरु असलेल्या आरोग्य केंद्राला भेट देऊन स्थानिक लोकांची कोरोना काळातील गैरसोय व अडचण लक्षात घेऊन अनिकेत तटकरे यांनी सतत पाठपुरावा करून या ऑक्टोबर महिन्यातच महागांव आरोग्य केंद्राचे उदघाटन आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे आणि पालकमंत्री कु. अदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण करून दुर्गम भागातील १६ गावातल्या लोकांची अडचण दूर केली.

आरोग्य, मूलभूत, क्रीडा, मनोरंजन अशा असंख्य गोष्टी त्यांनी प्रामाणिकपणे करून रायगडमधील जनतेच्या मनात आपली जागा बनवली आहे. राजकारणापेक्षा समाजकारणात वरचढ असलेल्या आणि लोकांमध्ये ‘भाई’ म्हणून प्रचलित असलेल्या शांत व संयमी आमदार श्री. अनिकेत तटकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.