राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचे आवाहन. इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना मतदान करून विजयी करा.
अनेक निवडणुका आपण पाहिल्या. पण यावेळेची निवडणूक एक आगळीवेगळी आहे. आज देशाच्या समोर अनेक प्रश्न आहेत. ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी अनेक गोष्टी लोकांसमोर सांगितल्या. पण प्रत्यक्षात लोकांची फसगत करण्याचा प्रयत्न केला. या देशामध्ये आधीच्या वक्त्यांनी सांगितलं, अनेक प्रश्न आहेत. रावणाला १० तोंडं होती असं म्हणतात. आज या देशात मोदींच्या राजवटीत कोणते प्रश्न आहे, असे जर विचारल्यास रावणाच्या त्या १० तोंडांसारखं आहे. अनेक प्रश्न याठिकाणी आहेत.
महागाईचा प्रश्न आहे. मोदींनी सत्ता हातात घेतल्यानंतर सांगितलं की, मला ६ महिन्याचा कालावधी द्या, या देशातील महागाई ही पूर्णपणाने घालवल्याशिवाय राहणार नाही. आज काय स्थिती आहे ? पेट्रोलच्या डिझेलच्या किंमती त्यावेळेला काय होत्या आणि आज काय आहेत ? किती वाढल्या ? त्यासंबंधीचं मोदींनी काय काम केलं ? तुमच्या घरामध्ये येणाऱ्या गॅस सिलेंडरची किंमत एक होती. मोदींच्या १० वर्षांच्या काळामध्ये कमी होण्याऐवजी ती दीडपट, दोनपट वाढली.
ज्याचा उल्लेख याठिकाणी आधीच्या वक्त्यांनी केला की, या देशातील तरूण पिढीला कष्ट करायचा अधिकार आहे. आणि तो अधिकार त्यांना गाजवायची संधी द्यायची असेल तर रोजगार पुरवला पाहिजे. आणि आताच देसाईंनी सांगितल्याप्रमाणं जगामध्ये एक संघटना आहे, त्याला म्हणतात ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. त्या ऑर्गनायझेशनने या देशाच्या बेकारीचा अभ्यास केला, आणि हा निष्कर्ष काढला की, या देशामध्ये एकंदर असलेल्या तरूणांपैकी ८६ टक्के तरूण आज नोकरीसाठी वणवण हिंडत आहेत. ही बेकारीची अवस्था आहे आणि मोदींची गॅरंटी काय, तर मोदींची गॅरंटी ही आहे असे मुद्दे शरद पवार यांनी आपल्या भाषणावेळी मांडले.
हेगडे नावाचे एक मंत्री बँगलोरचे, मोदी साहेबांच्या संस्थेचे, त्यांनी जाहीरपणाने सांगितलं की, आम्हाला साडेचारशे जागा निवडून द्या, कारण या देशाच्या घटनेत बदल करायची ताकद मोदींची व्हावी त्यासाठी आम्हाला मत द्या. उत्तर प्रदेशमध्ये लालू सिंह नावाचे एक खासदार आहेत, त्यांनी सांगितलं की, सध्याची घटना ही कुचकामी आहे. त्याच्यात बदल करायची आवश्यकता आहे. ते जर करायचं असेल तर मोदी साहेबांच्या उमेदवाराला मतदान करा. त्यांना चारशेपेक्षा जास्त जागा द्या. ज्योती मिर्धा नावाची एक भगिनी, राजस्थानची खासदार होती. त्यांनी जाहिरपणाने सांगितलं की, मोदींकडे सत्ता द्या, त्यांची शक्ती वाढवा. त्यामुळं आपण देशामध्ये घटना बदलू शकू.
यातली प्रत्येक व्यक्ती ही भाजपची आहे. प्रत्येक व्यक्ती जे म्हणणं मांडते ती मोदींना आणखी ताकद देण्यासाठी मांडते. आणि उद्या निवडून जर शक्ती मिळवली आणि घटना जर बदलली गेली, बाबासाहेबांचा तुमचा माझ्या सगळ्यांचा अधिकार हा जर उध्वस्त झाला तर देश संकटात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या सगळ्या प्रश्नांसाठी आपण जागरूक राहिलं पाहिजे. काहीही झालं तरी, हिंदू-मुस्लीम, ईसाई-मुस्लीम, ईसाई-हिंदू, शीख आणि मुस्लीम, शीख आणि हिंदू याप्रकारचं एक अंतर हे वाढवण्याचा प्रयत्न करतात असेही ते म्हणाले.
पलीकडचा आपला एक मित्र देश आहे. त्याचं नाव रशिया. अलीकडच्या काळामध्ये त्या रशियाच्या नेतृत्वाने ज्यांचं नाव पुतिन आहे. त्यांनी सबंध देश मुठ्ठीमध्ये ठेवला आणि तिथली लोकशाही तिथली संसदीय पध्दत ही पूर्णपणानं आज उध्वस्त केलेली आहे. आज या देशातल्या लोकांना आणि देशाबाहेरच्या लोकांना सुध्दा हिंदुस्थानची चिंता वाटते आणि ती वाटत असताना त्यांना एकच वाटतं की मोदींच्या रुपानं या देशात पुन्हा पुतीन तयार होतो की काय ? आणि तो जर झाला तर हा देश योग्य रस्त्यावर राहणार नाही.
हा अखंड देश जतन करायचा असेल तर पुतीनची परंपरा याठिकाणी आणण्याच्या संबंधी कुणीही प्रयत्न करत असेल तर आपल्या सगळ्यांना एकसंघ होण्याच्या संबंधीची भूमिका घ्यावी लागेल, अशी तोफ इंडिया आघाडीचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी मोर्बा येथे इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारात बोलताना डागली.
शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यावेळी बोलताना म्हणाले, गद्दारांना गाडून देश वाचवण्याकरिता आम्ही एकत्र आलो आहोत. स्वच्छ चारित्र्याते उमेदवार अनंत गिते यांनाच विजयी करा असे आवाहन त्यांनी अखेरीस केले. यावेळी इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे आदिंनी विचार मांडले. यावेळी व्यासपीठावर नेते सुभाष देसाई, भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंतराव पाटील, सुषमाताई अंधारे, व्यासपीठावरचे अन्य सगळे सहकारी व राष्ट्रवादी काँ. शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट
आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group