nitin desai on sunil tatkare saheb

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट



जगाला सुनील तटकरे माहित आहेत ते लोकांचे नेते म्हणून, पण मला त्यांच्यामध्ये भेटला एक जिव्हाळ्याचा मित्र. या मैत्रीने मंत्रिपदाची झूल बाजूला ठेवून मला नेहमीच प्रेम आणि आपुलकी दिली आहे.



मी मूळचा कोकणचाच असल्यामुळे साहेबांची आणि माझी ओळख दहा वर्षांपासून होती. आमच्या गावाला जायच्या रस्त्याच्या उदघाटनाच्या वेळी ती झाली. त्यावेळी कोकणातील कलाकार म्हणून माझा विलासराव देशमुखांच्या हस्ते सत्कार झाला त्यावेळी झालेली ती ओळख. त्यानंतर त्यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांच्या विवाह सोहळ्याच्यावेळी अगदी दिवसाच्या प्रत्येक तासाला आणि तासातील प्रत्येक क्षणाला सुनील तटकरेंना जवळून पाहता आले.

tatkare saheb todkar wishes


त्यावेळी त्या घरगुती वातावरणात बरीच ये-जा झाली आणि चांगले संबंध जुळून आले. त्यानंतर तीन महिन्यांच्या आतच ‘राजा शिवछत्रपती’ या महामालिकेच्या ६ जूनला रायगड किल्ल्यावर शुभारंभ करण्याच्या कार्यक्रमाला अतिशय व्यस्त कार्यक्रम असतानाही स्वतः ते हेलिकॉप्टरने येऊन गेले. सुनील तटकरेंच्या मनातला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर आणि नितीन देसाईंसाठी असलेले प्रेम दिसले. त्यांच्याबद्दलचा माझ्या मनातला आदर त्यामुळे अधिकच वाढला.



‘राजा शिवछत्रपती’ या महामालिकेच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्री व अन्य मंडळींची भेट घेण्यासाठी व वनखाते, इतिहास सर्व्हेक्षण आदी विभागांत असलेल्या कामांसाठी सुनील तटकरे साहेबांनी व्यक्तिशः लक्ष घालून मदत केली. केवळ नेतेच नाहीत, तर उत्तम मित्रत्व जपणारे प्रेमळ व्यक्तिमत्व अशी मला त्यांची झालेली ओळख आणि जनसेवा करताना जनतेला आपलेसे करणे हा त्यांचा स्वभावधर्म मला जाणवला.

त्यांच्याशी चर्चा करताना त्यांच्या अंगावर मंत्रिपदाची झूल नसते, तर मायेची व आपुलकीची शाल असते. कोणत्याही प्रसंगामध्ये भेट झाली वा त्यांना काही कळल्यास प्रत्येक वेळी घरगुती नात्याने त्यांनी विचारपूस केलेली आहे. त्यांच्याच कुटुंबातील एक सदस्य म्हणून मान दिला आहे.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना त्यांना दीर्घायुष्य मिळो व त्यांचे जनमानसात असलेले स्थान कायम राहो असे वाटते. एका वाक्यात सांगायचे, तर महान पण जवळचे व्यक्तिमत्व, ज्यांच्यामुळे कोकणची शान वाढत आहे. कोकणच्या विकासासाठी ते सतत प्रयत्नशील असतात.

हे हि वाचा: जाणता राजाच्या शेवटच्या प्रयोगानंतर गहिवरलेले सुनीलराव स्वतः प्रत्येक कलाकाराविषयी आत्मीयतेने बोलले. – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

(साभार: कर्तृत्ववान गौरव विशेषांक)


आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

Raigad Explore Ads with us
error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.