पावसामुळे धोक्याच्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षा व कायदा व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून माणगांव तालुक्यातील मौजे भिरा गावचे हद्दीत देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट सणसवाडी व आजूबाजूच्या १ किमी परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेला असून नागरिक व पर्यटकांचे जीवित व मालमत्तेची हानी हानी होऊ नये म्हणून या परिसरात प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(४) नुसार हा प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.
खालील बाबींसाठी दिनांक ४ जुलै ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीसाठी मौजे भिरा गावचे हद्दीत देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट सणसवाडी व आजूबाजूच्या १ किमी परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू.
१. पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्याचे परिसरात मद्यपान करणे किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्या जागेवर मद्यसेवन करणे.
२. पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे अशा ठिकाणी सेल्फी /फोटो काढणे व कोणत्याही स्वरूपाचे चित्रीकरण करणे तसेच रहदारीवर परिणाम करणाऱ्या ठिकाणी फोटोग्राफी करणे.
३. पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या धोकादायक व खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे.
४. धबधब्याच्या वरील बाजूस जाणे अथवा धबधब्याच्या धोकादायकरीत्या पडणाऱ्या पाण्याच्या झोताखाली बसणे.
५. वाहन अतिवेगाने चालवणे तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे वाहन चालवणे.
६. सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकोल व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे.
७. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा चालवणे, गाडीमधील स्पीकर वाजवणे, डी जे सिस्टीम कर्कश आवाजात वाजवणे व त्यामुळे ध्वनिप्रदूषण करणे.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group