eknath shinde 3 new announcements from vidhanbhawan


शिंदे-फडणवीस सरकारनं एकूण 164 सदस्यांचा पाठिंबा मिळवत विधानसभेतील बहुमत चाचणी आज जिंकली असून विधानसभा अध्यक्ष निवडीपाठोपाठ बहुमत चाचणी जिंकून सरकारनं विरोधी महाविकास आघाडीला धोबीपछाड दिली आणि पहिला टप्पा पार केला. मुख्यमंत्र्यांनी समारोपाच्या भाषणावेळी तीन मोठ्या घोषणा केल्या.



राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरचा कर लवकरच कमी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी केली. हिरकणी गाव वाचवण्याकरता 21 कोटींचा निधी मंजूर केला आहे. तर शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र आम्ही करणार असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.



रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. तसेच केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी केली. त्याच धरतीवर आता राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्यात येईल. त्यामुळे त्याचा फायदा हा राज्यातील जनतेला होणार आहे. येणाऱ्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले..




आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.