the kashmir files shooting incident


सध्या संपूर्ण भारतात चर्चा सुरु आहे ती ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची. १९९० च्या दशकातील १९८९-९० मध्ये काश्मीरमधील पंडित आणि हिंदूवर झालेल्या आत्याचारावर हा चित्रपट आधारित असून चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान, किती अडचणी आल्या या विषयी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले आहे.



“काश्मीर फाइल्सच्या शूटिंगदरम्यानची खरी घटना, काश्मीर फाइल्सच्या सुरुवातीचा सीन, ज्यामध्ये फारुख अहमद बिट्टाने भारतविरोधी घोषणा दिल्या. हा सीन देहरादूनमध्ये शूट करण्यात आला होता. दहशतवादी बिट्टाची व्यक्तिरेखा मराठमोळा चिन्मय मांडेलकरने साकारली आहे आणि शूटिंगदरम्यान देहरादूनचे स्थानिक लोक त्याच्या जवळ होते,” असे विवेक म्हणाले.



चित्रपटाची शूटिंग चालू आहे म्हणून तेथील स्थानिक लोक आनंदाने शूटिंगमध्ये सहभागी झाले होते परंतु शुटींगच्या सीनमध्ये चिन्मय मांडलेकर अतिरेक्याची भूमिका साकारत होता आणि पाकिस्तान जिंदाबाद असा डायलॉग चालू असताना स्थानिकांनी आक्षेप घेतला आणि शूटिंग थांबवले.



त्यानंतर चित्रपट निर्मात्यांना सर्वांना समजावून सांगावे लागले की हा चित्रपट भारताच्या विरोधात नाही तर आम्ही सत्य बाजू मांडत आहोत म्हणून असे डायलॉग आहेत. अतिरेकी भूमिका साकारणारा चिन्मय मांडेलकर याने त्यांना त्यांच्या मराठी चित्रपटांची झलक दाखवली ज्यात तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसला आहे. यानंतर अखेर स्थानिक लोकांनी शूटिंगला परवानगी दिली आणि चिन्मयनेसुद्धा शूटिंग संपताच लगेच भारत माता की जय चा नारा दिला.”


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.