एकनाथ शिंदे यांनी महाडचे आमदार भरत गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केली आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीचे निशाण फडकवल्यानंतर त्यांच्यासोबत रायगडातील शिवसेनेचे तिन्ही आमदार गेले आहेत. यात महाडचे आमदार भरत गोगावले यांचादेखील समावेश आहे. शिवसेनेच्या तिकिटावर तिनवेळा निवडूण आल्यानंतरही पक्षाकडून लक्ष दिले जात नसल्याचे त्यांना शल्य होते.
आमदार भरतशेठ गोगावले यांना मंत्रीपदाची अपेक्षा होती मात्र ते मिळाले नाही आणि राष्ट्रवादीचा जिल्ह्यात एकमेव आमदार असताना देखील राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद देण्यात आले. रायगडच्या बाहेरचा पालकमंत्री दिला तरी चालेल पण तो शिवसेनेचा असावा अशी त्यांची मागणी कायम होती परंतु तसे होताना दिसले नाही.
दरम्यान, एकाबाजूला कोणताही वेगळा गट स्थापन करणार नाही असे म्हणार्या शिंदे यांनी गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करुन शिवसेना नेतृत्वाला शह देण्याचा प्रयत्न केला आहे.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group