माणगांव तालुक्यातील युवा नेतृत्व श्री प्रतीक रहाटे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष श्री अमित ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले आहे.
प्रतीक रहाटे हे मनसेचे माणगांव तालुका अध्यक्षपदी असताना त्यांनी युवकांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी मेहनत घेतली होती. तसेच माणगांव तालुक्यात अनेक प्रश्न आणि मुद्दे त्यांनी प्रकार्षाने मांडले होते. याची पक्षाने दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रायगड जिल्हाध्यक्ष हे पद दिले आहे.
पक्षाने तसेच प्रामुख्याने अमितसाहेब ठाकरे यांनी दाखवलेला विश्वास आपण सार्थ ठरवू आणि जिल्ह्यातील युवकांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी सतत झटत राहू असे प्रतीक रहाटे यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले.

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group