स्वातंत्र्य भारताला पाहिलं ऑलीम्पिक पदक मिळवून देणारे कोल्हापूरच्या मातीतले मराठमोळे कुस्तीतले पैलवान स्व. खाशाबा जाधव यांच्या नावाची शिफारस सध्या पद्मभूषण पुरस्कारासाठी केली जात आहे. खरं तर ते भारतरत्नच आहेत इतकं त्यांचं प्रेरणादायी काम आहे.
भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर क्रीडा जगतात भारताचे नाव मोठे करणारे एक हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद आणि दुसरे होते खाशाबा जाधव. १९५२ साली हेलसिंकी ऑलिम्पिक कुस्ती प्रकारात खाशाबा जाधव यांनी भारतासाठी पहिले कांस्य पदक जिंकले होते.
हे पदक मिळाल्यानंतर तब्बल ४४ वर्षानंतर भारतात दुसरे मेडल आले होते.

सध्या याच गोष्टीला अनुसरून कोल्हापूरकरांनी पुन्हा एकदा मरणोत्तर पदमभूषण पुरस्कार मिळावा म्हणून मागणी केलेली आहे. २०१४ सालीसुद्धा भारतरत्न मिळावा अशीच मागणी झाली होती.
@AUThackeray जी, @iAditiTatkare जी खाशाबा जाधव यांच्या नावाची शिफारस मरणोत्तर ‘पद्मभूषण’ पुरस्कारासाठी करावी अशी विनंती मी समस्त कोल्हापूरकरांच्या वतीने आपणांस करतो. #PadmaForKhashabaJadhav
— Ruturaj S. Patil (@ruturajdyp) September 15, 2020
आजच द. कोल्हापूरचे आमदार ऋतुराज पाटील यांनी पुन्हा हा मुद्दा घेऊन खाशाबा जाधव यांना पदमभूषण पुरस्कार मिळावा म्हणून सन २०२१ पद्म पुरस्कारकरिता केंद्र सरकारला नावे सुचविण्यासाठी गठीत केलेल्या राज्यस्तरीय शिफारस समितीतील आदित्य ठाकरे आणि अदिती तटकरे यांच्याकडे मागणी केलेली आहे.
केंद्र सरकारने खाशाबा जाधव यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी पद्म पुरस्काराने सन्मानित करावे ही महाराष्ट्रवासियांची मागणी लवकरच पूर्ण होवो.