pramod thakur appointed as khopte tantamukti samiti adhyakshya

उरण दि 13(विठ्ठल ममताबादे )सोमवार दिनांक 12/09/2022 रोजी ग्रुप ग्रामपंचायत बांधपाडा यांच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त कमिटी(खोपटे )च्या अध्यक्ष पदी विघ्नहर्ता सामाजिक संस्था चे संस्थापक प्रमोद पांडुरंग ठाकूर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी प्रमोद ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.



खोपटे गावातील माझ्याकडे येणारे वाद असतील तंटे असतील ते सामोपचाराने सोडवण्याचा पुरेपूर प्रामाणिक प्रयत्न करेन व या पदाचा सन्मान वाढवण्याचा प्रयत्न करेन.



यावेळी ग्रामपंचायतच्या सरपंच विशाखा ताई ठाकूर, उपसरपंच सुजित म्हात्रे, ग्रामसेवक रुपम गावंड, सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, सात पाड्याचे अध्यक्ष, ग्रामसुधारण मंडळ खोपटेचे सचिव कुमार ठाकूर तसेच उपस्थित ग्रामस्थाचे आभार म्हणून धन्यवाद व्यक्त केले.



ग्रामसेवक रुपम गावंड व सरपंच विशाखा ठाकूर यांनी प्रमोद ठाकूर यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.ग्रामस्थ, हितचिंतक, मित्र परिवार नातेवाईक यांनीही प्रमोद ठाकूर यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.