girish bapat bjp pune

भाजप खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.



पुण्याच्या राजकारणातले चाणक्य म्हणून ओळखले जाणारे गिरीश बापट १९७३ पासून राजकारणात सक्रिय झाले होते. टेल्को कंपनीत १९७३ ला कर्मचारी म्हणून काम करत असताना कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता. १९८३ ला पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. सलग ३ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते.



१९९३ ला झालेल्या पुण्यातील कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांचा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिलं नाही. कसबा पेठ मतदार संघातून १९९५ पासून सलग २५ वर्ष गिरीश बापट यांनी एक हाती आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं.



राज्याच्या मंत्रिमंडळात अनेकदा मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. त्यानंतर २०१९ ला पुण्याचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्याने निवडून आले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांना खासदारकीचं तिकीट मिळालं आणि मुक्ता टिळक या कसबा पेठमधून आमदार झाल्या परंतु मतदारसंघावर गिरीश बापट यांचाच वरचष्मा होता. मात्र गेल्या काही काळापासून आजारपणामुळे ते राजकारणात सक्रिय नव्हते.

गिरीश बापट हे पुण्याच्या राजकारणात ‘सर्वसमावेशक’ राजकारणासाठी ओळखले जातात. विरोधी पक्षाची सत्ता असली तरी आपले काम साधून घेण्याचे कसब गिरीश बापट यांना उत्तम अवगत असल्याचं पुण्यात जनतेला पाहायला मिळाले.

आत्ताच्या कस्ब्याच्या पॉट निवडणुकीत गिरीश बापट आजारी असताना भाजपच्याच नाहीतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही त्यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यासोबतच इतर अनेक नेत्यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

पुण्यात भाजपची यशस्वी वाटचाल करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. त्यांच्या निधनाने भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पुण्यात भाजप पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली होती. आज त्यांच्या जाण्याने सर्व स्तरातुन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.



आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.