उतेखोल/माणगांव, दि.१४ (रविंद्र कुवेसकर) माणगांव नगरपंचायतीचे सफाई बाबत दूर्लक्ष होतानाचे चित्र दिसत आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई काम अजुनही सुरु झालेले दिसून येत नाही. यंदा पावसाळा वेळेत सुरु होणार असल्याचे हवामान खात्याचे भाकीत आहे. साधारणतहा जुनच्या पहिल्याच पंधरवड्यात १० ते १२ जुनला पाऊस सुरु होईल, अशी चिन्ह आता पासूनच दिसत आहेत. १३ मे ला वळीवाच्या पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. अशातच माणगांव शहराचे सांडपाणी निचरा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह आहे.
अनेक गटारे बांधकामे झाली आहेत परंतु या सांडपाण्याला बाहेर पडण्यासाठी आऊट लेटची सोय नाही. कचेरी रोड, महामार्गावरील गटारे व इतरही भागात जेथे पाणी तुंबते तिथे साफसफाई होणे गरजेचे आहे अन्यथा पावसाळ्यात थोड्याशा पावसाच्या पाण्याने शहरात पाणी तुंबते, वेळीच या सफाईला सुरुवात करावी लागेल. यंदा निवडणुक प्रचार आणि इतर कामात सारे व्यस्त दिसत आहेत. अशातच माणगांव नगरपंचायतीची नविन इमारत बांधकाम कारणास्तव नगरपंचायत कार्यालय नविन भाड्याचे जागेत हलविण्यात आले आहे.

यामुळे यंदा या महत्वपूर्ण साफसफाईचे होणार काय? हा सवाल ऐरणीवर आला आहे. तहान लागल्यावर विहिर खोदण्यात काय अर्थ आहे. त्रास मात्र येथिल सर्वच माणगावकरांना भोगावे लागतील, असे आता उपहासाने जनमाणसातुन ऐकावयास मिळत आहे. शहरातुन वाहणाऱ्या माणगांवच्या कालव्याचे अक्षरशहा गटार झाल्याचे चित्र आहे. यामध्ये घरातील कुडाकचरा प्लॅस्टिक पिशव्यातून सहज भिरकावला जात आहे. कालव्यावर अनेक वसाहती जवळ हा कचरा आपण सहज पाहू शकतो. सर्वांना दिसत आहे पण यावर ठोस उपाय योजनाच नाही.
अनेक भागात प्लास्टिक कचऱ्याचे ढीग वारंवार दिसून येत आहेत परिणामी सांडपाणी निचरा व पडणारा पाऊस यामुळे हाच कचरा पावसाचे पाणी नैसर्गिक रित्या वाहून नेण्यास अडसर ठरतो व पाणी तुंबण्याचे प्रकार दिसून येतात. याच तुंबलेल्या पाण्यावर पुढे मच्छर तयार होऊन सार्वजनिक आरोग्यच धोक्यात येऊ शकते. यासाठीच शहराची पावसाळ्या-पूर्वीची स्वच्छता होणे अत्यंत महत्वाची बाब आहे.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group