केदारनाथ येथे कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चारधाम परिसरात प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला आहे, त्यामुळे दर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातून 110 यात्रेकरू चारधामला गेले आहेत. या ठिकाणी जारी केलेल्या अलर्टमुळे भाविकांनी सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
केदारनाथ खोर्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या आपत्तीमध्ये पर्यटक व यात्रेकरु अडकून पडले आहेत. रायगड जिल्ह्यातील जे यात्रेकरू केदारनाथ येथे यात्रेसाठी गेलेले आहेत, त्यांच्या कुटुंबियांनी तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष रायगड येथे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांच्याशी 02141-222118 , 02141-222097 अथवा 8275153363 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
केदारनाथ यात्रेमधील महाडच्या 10 पैकी 5 यात्रेकरूंचे दिल्लीकडे प्रस्थान करण्यात आले आहे. यामधील तिघे हरिद्वार तर दोघे केदारनाथ येथे सुरक्षित आहेत. महाड तालुक्यातील दहा यात्रेकरू सुरक्षित असल्याची माहिती यामधील एका यात्रेकरूने प्रतिनिधीशी भ्रमणध्वनीद्वारे बोलताना दिली आहे.केदारनाथवरुन दिल्लीकडे प्रस्थान केलेल्या भाविकांना मुंबईकडे येण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
अडकलेल्या यात्रेकरुंमध्ये रायगड जिल्ह्यातील जवळपास 70 ते 80 यात्रेकरु असून महाडमधील 20 ते 25 यात्रेकरुंचा समावेश असल्याची माहिती गोपाल मोरे यांनी फोनवरून दिली होती.
रायगडमधून केदारनाथकडे रवाना झालेल्या यात्रेकरु केदारनाथ कॅम्पकडे जात असताना या ठिकाणी शासनाने रेड अलर्ट घोषित केला. ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून सर्व प्रकारची मदत मिळत असल्याची माहिती देऊन केदारनाथ येथील दोन सहकारी देखील सुरक्षित असल्याचे सांगितले.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group