आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये खडाजंगी झाली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला. आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक भिडले. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात विरोधकांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाने केला. सत्ताधारी पक्षाकडून याप्रकरणी 12 आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात यावा, असा ठराव मांडण्यात आला. हा ठराव मंजूर करण्यात आला असून भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे.
या आमदारांवर निलबंनाची कारवाई:
आशिष शेलार, पराग अळवणी, अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार, जयकुमार रावल, गिरीश महाजन, नारायण कुचे, राम सातपुते, योगेश सागर, हरिष पिंपळे, किर्तीकुमार उर्फ बंटी बागडीया
विरोधकांनी मला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या- तालिका अध्यक्ष
विधानसभा अध्यक्षांच्या दालनात विरोधकांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाने केला. यावर बोलताना तालिका अध्यक्ष यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं. सदस्यांना बसू नका असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. प्रस्ताव मांडण्यापूर्वीच विरोधकांनी हरकत घेतली. प्रस्ताव मंजूर करत असताना सदस्य व्यासपीठावर आले. विरोधकांनी माईक खेचण्याचा प्रयत्न केला. सभागृहातील गोंधळानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात विरोधक-सत्ताधारी बसून तोडगा काढतात. सभागृहाबाहेर गेल्यानंतर आपण कधीही कटुता ठेवत नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मी बसल्यानंतर फडणवीस लाललाल होऊन माझ्याकडे आले, मी बोलायची संधी न दिल्याने ते रागावले होते. विरोधक ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. विरोधकांनी मला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या. तुम्ही 50-60 आले तरी मी एकटा आहे. एक पाऊल सुद्धा मी मागे हटणार नाही, असं तालिका अध्यक्ष भास्कर जाधव म्हणाले.
आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group
