आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट


अनंत वारे (महागांव): खासदार सुनील तटकरे साहेब जिल्हा खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष असल्यापासून मी त्यांचा चाहता आहे. तळा-माणगांव-रोहा येथील साहेबांच्या काही कार्यक्रमांना उपस्थित असताना, स्वतःचे वैयक्तिक कामासाठी, एखाद्या व्यक्तीच्या किंवा गांव, वाडी, वस्तीच्या काही कामांनिमित्त साहेबांची भेट घेतली असता याप्रसंगी तटकरे साहेबांकडून बरेच काही शिकावयास मिळाले.

‘एकच ध्यास रायगडसह कोकणचा विकास’ हे त्यांचे धेय्य माझ्यासह अनेकांना वारंवार अनेक योजनांच्या पूर्ततेतून अनुभवयास मिळाले आहे. रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष ते महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी व सध्या दिल्लीच्या तख्तावर खासदार म्हणून विराजमान असलेल्या साहेबांनी प्रत्येक पदाचा सर्वसामान्य घटकांसाठी न्याय देण्याचाच प्रयत्न केला आहे. प्रत्येक विषयाचा दांडगा अभ्यास, अमोध वक्तृत्व, सखोल माहितीचा संग्रह, असखलीत इंग्रजीतून संवाद या गोष्टींमुळे त्यांची अधिकारी व कर्मचारी वर्गावर छाप पडते. कोणीही अधिकारी दिशाभूल करत नाही अथवा चुकीची माहिती देत नाही.

मिळालेल्या प्रत्येक खात्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ते संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करतात. त्यांच्या अडीअडचणीही समजून घेतात व अचूक मार्गदर्शन करतात. एवढेच नाही तर दौऱ्याच्या वेळी सोबत असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची योग्य ती काळजीही घेतात. त्यामुळे साहेबांच्या संपर्कात आलेला अधिकारी मनापासून व झपाटल्यासारखे काम करत असतो.

कार्यक्रमासाठी साहेब ज्या वस्तीत, पाड्यात, गावांत, शहरांत जातात त्यावेळी त्या ठिकाणच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यास नावाने किंवा टोपण नावाने हाक मारतात व विचारणा करतात, हि त्यांच्या तीव्र स्मरणशक्तीची प्रचिती. एवढेच नाही तर याठिकाणी यापूर्वी मी स्वतः कधी, कोणत्या योजनेचे उदघाट्न अथवा भूमिपूजन करायला आलो होतो त्याचाही ते उल्लेख करत असतात.

साहेबांना राजकारणाबरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम, सामाजिक उपक्रम यांची विशेष आवड असल्यामुळे त्यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघात तसेच रायगड जिल्ह्यात नाट्यगृह उभारले तसेच मराठी बाणा, जाणता राजा हे महानाट्य, ‘एक सूर एक ताल’ हा विद्यार्थ्यांसाठीचा खास उपक्रम चिंचवली रोहा तसेच मुरुड, अलिबाग, श्रीवर्धन, माथेरान येथे मोठे महोत्सव आयोजित करून लोकांना लाभ घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देतात.

महिलांसाठी बचतगट, मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून भरगोस अनुदान मिळवून दिले आहे. या सर्व उपक्रमांच्या आयोजनांमुळे साहेब महिलांना आपले भाऊ वाटतात, तरुणांना आपले मित्र वाटतात, विद्यार्थ्यांना मार्गदर्शक व दानशूर व्यक्ती वाटतात. वयोवृद्ध व्यक्तींना ते मुलासारखे वाटतात.

१० जुलै वाढदिवसादिनी सर्वसामान्य कार्यकर्ता ते उच्चपदस्थ अधिकारी, कर्मचारी, महिलावर्ग, युवक-युवती आवर्जून उपस्थित राहून साहेबांना शुभेच्छा देतात.

अथं निज: परोवेत्ती गणना लघूचे तसाम, उदार चरितानां तु वसुधैव कुटुम्बकम

या शुभाषितात वर्णन केल्याप्रमाणे आपला-परका, लहान-मोठा, अधिकारी-कर्मचारी, कार्यकर्ता-पदाधिकारी असा कोणताच भेदभाव न ठेवता साहेब सुहास्य वदनाने प्रत्येकाच्या शुभेच्छांचा स्वीकार करतात व प्रतिसादही देतात. त्यामुळे प्रत्येकाचा साहेबांविषयीचा जिव्हाळा अधिकच वाढतो व टिकून राहतो. मात्र गतवर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे वाढदिवसानिमित्त साहेबांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देता येत नसल्यामुळे अनेकजणांना या आनंदोत्सवाला मुकावे लागले आहे.

आणखी एक विशेष म्हणजे साहेबांकडे तक्रार घेऊन जाणारे कार्यकर्ते, कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी यांची संख्या अगदी मोजकीच असते. याचे कारण म्हणजे तक्रार अर्धवट किंवा ऐकीव माहितीच्या आधारावर असेल किंवा तिच्यात फारसे तथ्य नसेल तर साहेब तक्रार घेऊन जाणाऱ्यास तिथेच चांगले खडसावतात त्यामुळे सहसा चुकीची किंवा अर्धवट तक्रार घेऊन जाण्यास कोणी धजावत नाही.

साहेबांचे कर्तृत्व एवढे महान व विस्तृत आहे कि ते एवढ्याशा लेखात सामावणे शक्यच नाही. परंतु आजपर्यंत साहेबांविषयी जे पहिले, अनुभवले ते थोडक्यात शब्दांकन करण्याचा हा अल्पसा प्रयत्न केला आहे.

साहेब आपणांस माझ्याकडून व कुटुंबियांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच आपला राजकीय व सामाजिक वारसा प्रभावीपणे पुढे घेऊन जाणाऱ्या आपल्या दोन्ही मुलांच्या (अनिकेतभाई व आदितीताई तटकरे) पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा.
आपलाच शुभेच्छुक, चाहता व हितचिंतक
श्री. अनंत ला. वारे (निवृत्त-गटसमन्वयक सर्व शिक्षा अभियान तळा, राहणार महागांव ता. तळा)

हे हि वाचा: जाणता राजाच्या शेवटच्या प्रयोगानंतर गहिवरलेले सुनीलराव स्वतः प्रत्येक कलाकाराविषयी आत्मीयतेने बोलले. – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
वाढदिवस विशेष लेखन: मी पाहिलेले सुनील तटकरे साहेब- प्रसिद्ध सिनेकला दिग्दर्शक नितीन देसाई…


आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

Raigad Explore Ads with us
error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.