आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट
आमचे परममित्र श्री सुनीलरावांना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मनापासून आशीर्वाद. अभय मांढरे आणि आप्पासाहेब रेणुसे यांच्यातर्फे पुण्यात पुण्यभूषण व जुन्नरभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येतो. २००८ सालचा पुण्यभूषण पुरस्कार मला आणि जुन्नरभूषण पुरस्कार डॉ. माधव पोतदार यांना जाहीर झाला होता. डॉ. माधव पोतदार मूळचे रोह्याचे, त्यामुळे हा पुरस्कार त्यांच्याच गावचे मंत्री व राज्याचे अन्न व नागरीपुरवठामंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते देण्याचे अभय मांढरे आणि आप्पासाहेब रेणुसे यांनी ठरवले.
त्याप्रमाणे त्या दिमाखदार सोहळ्यात माझी आणि सुनीलरावांची ओळख अभय मांढरेंनी करून दिली आणि आम्ही जवळचे झालो. मला भावलेले सुनीलराव म्हणजे साध्या स्वभावाचे, मधुर आणि गोड. आस्थापूर्वक प्रत्येकाची चौकशी करणारे, प्रत्येक क्षेत्रात सक्रिय असणारे, मंत्र्यांपेक्षाही एक माणूस म्हणून जास्त वावर असलेले. ते भेटलेल्या व्यक्तीबद्दल केवळ औपचारिकता ठेवत नाहीत तर अगदी प्रेमाने, जिव्हाळ्याने त्या व्यक्तीच्या, संस्थेच्या कामाबद्दल काय करता येईल याची ते चौकशी करतात.

माझ्या जाणता राजाच्या रोह्यातील कार्यक्रमाच्या दोन आठवड्यांच्या वास्तव्यात रोहे आणि रोह्याच्या परिसरात त्यांना असलेला लोकांचा प्रतिसाद लाघवी, मनस्वी आणि जिव्हाळ्याचा होता. त्यांचे अगदी प्रत्येकाशी चांगले संबंध होते. जणू ते त्या परिसराचेच कुटुंबप्रमुख होते. लोकांच्या मनावर ते राज्य करीत असल्याचे दिसले. पोळ्याभोवती माशा गोळा व्हाव्यात तशी माणसे त्यांच्याभोवती गोळा होत असतात.

कलाक्षेत्रातला त्यांचा वावर सहज आहे. जाणता राजाच्या शेवटच्या प्रयोगानंतर गहिवरलेले सुनीलराव स्वतः प्रत्येक कलाकाराविषयी आत्मीयतेने बोलले. त्यांच्या या साध्याशा कृतीने त्यांच्याबद्दल कलाकारांच्या मनात मोठा आदर निर्माण झाला.
त्यांना पुढील जीवनात अधिकाधिक यश व प्रगती मिळो हि आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करीत असताना त्यांनी मानणाऱ्या शेतकरी वर्गाच्या हिताकरिता काम करावे अशी मी इच्छा व्यक्त करतो.
‘राजश्री महाराजांचा दरबार तो सर्वा सहज’ असं महाराजांबद्दल बोललं जायचं, अगदी तसच सुनीलरावांबद्दल बोलावसं वाटतं. कारण, ते लोकांचे नेते आहेत. त्यांची बैठक म्हणजे कुठल्याही श्रमिकाला, शतकऱ्याला, रयतेला, कुणालाही अगदी सहज जाता येईल अशी आहे.
– शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
हे हि वाचा: वाढदिवस विशेष लेखन: मी पाहिलेले सुनील तटकरे साहेब- प्रसिद्ध सिनेकला दिग्दर्शक नितीन देसाई…
(साभार- कर्तृत्ववान गौरव विशेषांक)
आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group
