spg security in Indiaspg security in India

कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी कंगना राणावतला Y दर्जाची सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले. जाणून घेऊया भारतातील VIP लोकांना पुरविल्या जाणाऱ्या या सुरक्षेसाठी किती पोलीस कर्मचारी लागतात आणि महिन्याला सुरक्षेसाठी किती खर्च येतो.

भारतात महत्वाच्या व्यक्तींना सुरक्षा एकूण ४ गटांत पुरवली जाते. SPG, X, Y, Z and Z+.

SPG (Special Protection Group):

हि देशातील सर्वात मोठी आणि क्रमांक १ ला असणारी सुरक्षा असून ती फक्त भारताच्या पंतप्रधानांना पुरविली जाते. आणि विशेष म्हणजे हि सुरक्षा भेदणे अतिशय कठीण असते. हि सुरक्षा पंतप्रधानांना असल्यामुळे यात काम करणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्यांना वर्षाला ७ ते २५ लाखांपर्यंत पगार दिला जातो.


प्रांतप्रधान यांचे दौरे आणि भाषणे असताना कोणतीही सुरक्षितते कमी पडू दिली जात नाही. २०१९-२० देशाची निवडणूक असताना एका वर्षात तब्बल ५३५ करोड खर्च सुरक्षिततेसाठी करण्यात आला होता ज्यात पंतप्रधान यांच्यासह गांधी परिवाराला हि SPG सुरक्षा दिली गेली होती.

Z+ प्रकारची सुरक्षा:

Z+ हि सुरक्षा फक्त अतीमहत्वाच्या व्यक्तींना दिली जाते यात भारतातील साधारण १२-२० व्यक्तींना हि सुरक्षा पुरवली जात आहे. माजी पंतप्रधान, उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री, राज्यपाल, महत्वाचे केंद्रीय मंत्री, उद्योगपती अथवा खेळाडू, कलाकार, सर्वोच्च-उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना हि सुरक्षा पुरविली जाते.या सुरक्षेमध्ये एका व्यक्तीसाठी तब्बल ५५ सुरक्षा रक्षक असतात ज्यामध्ये प्रत्येक कमांडोला मार्शल आर्ट येत असते व इतर सर्व अत्याधुनिक यंत्रे व बंदुका वापरल्या जातात.

Z प्रकारची सुरक्षा:

यामध्ये २२ सुरक्षा कर्मचारी असतात त्यात ४-५ NSG कमांडो असतात. तसेच एक सुरक्षा कार देखील पुरविली जाते. Z सेक्युरिटीमध्ये दिल्ली पोलीस, CRPF किंवा इंडो-तेबेटीयन बॉर्डर पोलीस (ITBP) यांमधून अधिकाऱ्यांची निवड केली जाते.

Z सेक्युरिटीसाठी मुकेश अंबानी यांच्यासाठी महिन्याला १५ ते १६ लाख खर्च येतो.

Y सुरक्षा व्यवस्था:

हा सुरक्षातीतेच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकाचा स्तर असून कमी धोका असणाऱ्या महत्वाच्या व्यक्तींना हि सुरक्षा पुरविली जाते. यात १-२ NSG कमांडोसहित एकूण ११ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असतो.

X प्रकारची सुरक्षा:

हि चौथ्या क्रमांकाची सुरक्षा व्यवस्था असून फक्त २ सशस्त्र पोलिसांचा यात समावेश असतो. यामध्ये कमांडोचा समावेश नसतो.

या सुरक्षेसाठी जवानांची निवड कुठून केली जाते:

  • SPG (Special Protection Group)
  • NSG (National Security Guard)
  • CRPF (Central Reserve Police Force
  • ITBP (Indo-Tibetan Border Police)
error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.