yuvashakti pimri chinchwad

मदत नव्हे कर्तव्य – ” एक हात कोकणासाठी,कोकणी बांधवांसाठी “
प्रतिनिधी:-सुनिल ढेबे



कोकणात महापुराने अतोनात आर्थिक हानी व जीवित हानी होवुन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कोकणावर आलेल्या या संकटाला सामोरे जाण्यासाठी व आपल्या बांधवासाठी कोकण खेड युवाशक्तीच्यावतीने ” एक हात कोकणासाठी,कोकणच्या मातीसाठी,कोकणवासीयांसाठी ” या संकल्पनेद्वारे पिंपरी चिंचवड शहरातील बांधवांनी घासातला घास म्हणुन आर्थिक व वस्तु स्वरूपात मदत केली. यामध्ये कोकण कन्या ग्रुप पिं चिं मंडळांनी देखील आपल्या घरखर्चातुन थोडेफार ठेवलेल्या पैशातुन जे शक्य होईल.तशी आपल्याबांधवांना मदत करण्यासाठी पुढे आले.



कोकण खेड युवाशक्तीच्यावतीने खेड तालुकामधील अनेक नुकसानग्रस्त गावामधील पोसरे,निवेगांव,निवे-रामवाडी,साखर-सडेवाडी,धामनंद, केळणे-भोसलेवाडी ,कंदोशी, आवाशी फाटा,परशुराम फरशी, जाधववाडी, खेड ब्राम्हण आळी, सुसेरी बौद्ध वाडी,तसेच चिपळूण मधील कळबस्ते,खेर्डी,बहादुरशेख-शंकरवाडी, पदुमलेवाडी येथील नुकसानग्रस्त २५० कुटुंबियांना अन्नधान्य किट व १० कुटुंबियांना रोख रक्कम स्वरूपाची कर्तव्यारूपी मदत करण्यात आली.



पोसरे येथे जे महापुर व दरडदुर्घटनेते मृत पावले आहेत. त्या बांधवांना कोकण खेड युवाशक्ती पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने भावपुर्ण आदरांजली व्यक्त करण्यात आली.
कोकण खेड युवाशक्तीच्या या मदत कार्यात कोकण खेड युवाशक्तीचे अध्यक्ष श्री.अभिजितभाऊ कदम व युवाशक्तीचे ४० ते ४५ युवा पदाधिकारी,सहकारी यांनी मदतीचे नियोजन व योगदान केले.



तसेच पिंपरी चिंचवड शहरातील समाज बांधवांनी,महिला मंडळांनी तसेच कोकणातील कोकणी बांधवांनी जे सहकार्य केले.त्याबद्दल आपल्या सर्वांचे कोकण-खेड युवाशक्ती ने तुम्हाला भविष्यात काही मदत लागली तरी ती मदत आम्ही करू असे ही सांगण्यात आले पूरग्रस्तांनाकडून तसेच सर्व स्तरातून कौतुक होत आहे


आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

Raigad Explore Ads with us
error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.