पोलादपूर – संदिप जाबडे: कोंकण रहिवाशी संघ, पुणे (वडगाव शेरी चंदन नगर) आणि अखिल कोकण युवा संघ पुणे मार्फत महाड, पोलादपूर व चिपळूण तालुक्यातील पूरग्रस्त व दराडग्रस्त कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंच्या ३५० किटचे वाटप दिनांक १ व २ ऑगस्ट रोजी करण्यात आले.



२२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोंकणातील हजारों कुटुंबांचे प्रचंड नुकसान झाले. या कुटुंबियांसाठी कोंकणकर या नात्याने मदतीचा हात पुढे सरसावत या संस्थेने मदत केली. ०१ ऑगस्ट रोजी महाड शहरातील बाजारपेठ परिसर, रोहिदास नगर, आसनपोई, बिरवाडी, रानवडी कर्णवाडी या गावांमध्ये तर पोलादपूर शहरातील बाजारपेठ परिसर व चरई या गावात अन्नधान्य व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.



दुसऱ्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील दळवटने, खेडी, सती, पिपळीगाव या गावांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.



या मदतकार्यास संस्थेचे अध्यक्ष वसंत आमकर, गणेश जाधव,सचिव दीपक येरापले, उपसचिव नितीन मोरे, उपखजिनदार संतोष सावंत, गणेश जाधव, राजू मोरे, सुनील देशमुख, नामदेव जाधव, अजित ढोकळे, सचिन उत्तेकर ,गणेश घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.




आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

Raigad Explore Ads with us
error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.