पोलादपूर -संदिप जाबडे: २२ जुलै रोजी आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये पोलादपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये दरडी कोसळून जीवितहानी झाली. अनेक घरे उध्वस्त झाली, रस्ते व पुल वाहून गेले,रस्ते खचले आणि यामुळे वाहतूक दळणवळण ठप्प झाले. अशी परिस्तिथी असताना मुळशी तालुक्यातील लवळे ग्रामस्थ तसेच लवळे ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच निलेश गावडे, ग्रामपंचायत सदस्य, लवळे ग्रामस्थ व स्व.पप्पूभाऊ गावडे प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने पोलादपूरसाठी मदतीचा हात पुढे करीत जीवनावश्यक वस्तूंचे 200 किट तयार केले.
यामध्ये तांदूळ, डाळ, कडधान्य, तेल,
गव्हाचे पीठ, बेसन पीठ, मसाला, हळद, मीठ, साखर, चहापावडर, कांदे, बटाटे, मेणबत्ती, माचीस इत्यादी वस्तूंचे समाविष्ट होत्या. त्याबरोबरच पोलादपूर शहरासाठी 100 पाणी बॉक्स एवढं साहित्य घेऊन सर्व ग्रामपंचायत सहकाऱ्यांसोबत पोलादपूर मध्ये येऊन ग्रामीण भागातील चिखली, कामथे या पूल वाहून गेलेल्या भागाची पाहणी करत कामथे गावाच्या वरील डोंगरात असलेल्या चांदले, चिखली, कुंभळवणे, वाकण सानेवाडी, स्थलांतर धामनीची वाडी, कीनेश्वर वाडी,चोरगे वाडी आणि महाड शहरामध्ये देण्यात आले.
पाण्याचे वाटप हे पोलादपूर शहरामधील आनंद नगर, शिवाजी नगर, प्राथमिक आरोग्य केंद्र पित्तलवाडी येथे करण्यात आले. सरपंच निलेश गावडे हे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी ग्रामीण भागात केलेल्या मदतीमुळे ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी सरपंच निलेश भाऊ गावडे यांच्यासोबत ग्रामविकास अधिकारी व्ही.डी. साकोरे, उपसरपंच रणजित राऊत, संजय सातव, ग्रा.पं.सदस्य अजित चांदीलकर, बाळासाहेब राऊत, राहुल खरात, सारिका कळमकर, किमया गावडे, वर्षा राऊत, नर्मदा टकले, सुजाता मोरे, सायली सातव, साधना सातव, राणीताई केदारी, ग्राम.पं. चे कर्मचारी वीर आणि कांबळे ग्रामस्थ संतोष पोटे, सुभाष गुगळे, गणेश गावडे, महेश सातव, सुरज केदारी, दत्तात्रय मोरे, ऋषिकेश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. ही मदत वाटप करण्यासाठी त्यांना त्यांचे सहकारी दीपेश भाऊ साने, ऋषिकेश जगदाळे, प्रसाद भाऊ साने यांचे सहकार्य लाभले. पोलादपूर तालुक्याच्या वतीने प्रसाद साने यांनी आलेल्या सर्व दानशूर व्यक्तींचे आभार मानले.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट
आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group
