Akshay kumarAkshay kumar turns 53 today

राजीव हरी ओम भाटिया अर्थात आपला अक्षय कुमार आज ५३ वर्षांचा झाला. ९ सप्टेंबर १९६७ रोजी त्याचा जन्म अमृतसर, पंजाब येथे झाला. वडील आर्मीमध्ये होते आणि निवृत्तीनंतर ते माटुंगा, मुंबई येथे वास्तव्यास आले.

मॉडेलिंग आणि बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याआधी अक्षय कुमार थायलंडला “मुये थाई” शिकायला गेला होता आणि तिथे त्याने कूक म्हणून हॉटेलमध्ये काम सुद्धा केले आहे. थायलंडहुन परतल्यानंतर काही वर्ष मॉडेलिंग केल्यानंतर १९९१ साली सौगंध या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले परंतु अक्षयचा पहिला हिट सिनेमा १९९३ सालचा “खिलाडी” चित्रपट होता.

अक्षय स्वतः कराटेमधील ब्लॅक बेल्टधारक असल्यामुळे स्टंट स्वतःच करायचा म्हणून त्याला खिलाडी हे नाव पडले तर काही वेळा त्याला “इंडियन जॅकी चॅन” म्हणून सुद्धा संबोधले आहे.

२००० साल सुरु झाल्यानंतर अक्षयने कॉमेडी चित्रपटांकडे मोर्चा वळवला आणि हेरा-फेरी, आवारा-पागल-दिवाना यांसारखे कॉमेडी सुपरहिट चित्रपट केल्यानंतर तो खऱ्या अर्थाने सुपरस्टार झाला. पण मुळात बरेचसे चित्रपट फ्लॉप होत असताना करिअर धोक्यात आले असतानाच धडकन या चित्रपटानेसुद्धा त्याला तारले.

त्यानंतर अक्षय ने मागे वळून न पाहता सर्वच प्रकारचे चित्रपट केले. एका वर्षात सर्वात जास्त हिट सिनेमे, जास्त कमावणारा तसेच जास्त टॅक्स भरणारा अभिनेता म्हणून अक्षय कुमार आता सर्वच लोकांचा चाहिता ठरला होता.

अक्षय कॅनडाचा नागरिक का झाला?

सन २०११ च्या दरम्यान कॅनडियन फेडरल इलेक्शन कंजर्व्हेटिव्ह गव्हर्नमेंटने अक्षयला कॅनडियन नागरिकत्वाने सन्मानित केले. त्याच्या लोकप्रयतेमुळे कॅनडा-भारत संबंध अधिक दृढ व्हावेत, ट्रेड संबंध, व्यावहारिक संबंध तसेच चित्रपट आणि टुरिझम सेक्टरला चालना मिळावी म्हणून अक्षय कुमारला कॅनडा सरकारने नागरिकत्व देऊन सन्मानित केले. परंतु त्याचा सोशल मीडियावर टीका आणि खिल्ली उडवली. त्याचे स्पष्टीकरण स्वतः अक्षय कुमारला द्यावे लागले.

अक्षय कुमारने २००१ साली करिअर रुळावर येताच राजेश खन्ना व डिंपल कपाडिया यांची मोठी मुलगी अभिनेत्री ट्विन्कल खन्ना सोबत लग्न केले.

अक्षय कुमार शुद्ध मराठी कसा शिकला?

वडील मुंबईत स्थायिक झाले होते आणि परिस्थिती चांगली नसतानासुद्धा त्यांनी अक्षयला डॉन बॉस्को या महागड्या इंग्लिश शाळेत घातले. शाळेत जायला अक्षय बेस्ट बसने प्रवास करायचा. परंतु एके दिवशी गर्दी असल्याने कंडक्टर अक्षयला पूढे जा असे मराठीत सारखं सांगत होता. परंतु अक्षयला मराठी येत नसल्याने त्याला काही कळत नव्हते. सारखं सांगूनसुद्धा पुढे जात नसल्यामुळे कंडक्टरने त्याला शिवी दिली. भरलेल्या बसमध्ये अपमान झाल्यामुळे त्याने निश्चय केला कि आपण मराठी शिकायचे.

शाळेत मराठी विषयाला शिकवायलासुद्धा आवडत्या शिक्षिका असल्याने त्याने बोलता येईल अशी उत्तम मराठी भाषा शिकली तसेच कॉलेजला असताना त्याची पहिली गर्लफ्रेंड मराठीच होती त्यामुळे तो उत्तम मराठी शिकला. आजही तो मराठीत मुलाखत देत असताना “ळ आणि ण” व्यवस्थित उच्चारतो.

वडील मिलिटरीमध्येच होते त्यामुळे त्याला आर्मी आणि सैनिकांविषयी प्रेम होते. म्हणून त्याने काही वर्षांपूर्वी भारत सरकारसह “भारत के वीर” ऍप काढून जखमी किंवा शाहिद सैन्यांच्या कुटुंबाला मदत करतो.

अक्षयला ५३ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.