raj-thakre-on-sukhi-mansacha-sadra

स्वतःचा राजकीय पक्ष जरी असला तरी राज ठाकरे एक कलाकार असून इतर कलांची नेहमीच पाठराखण आणि कौतुक ते करत आले आहेत. काही दिवसांपूर्वी सुबोध भावेचा ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याचे जाहीर कौतुक केले आणि आता केदार शिंदेंची नव्या येणाऱ्या मालिके संदर्भात ट्विट करून त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

‘सुखी माणसाचा सदरा’ या केदार शिंदे व भरत जाधव यांच्या नव्या मालिकेसंदर्भात राज ठाकरे म्हणतात “कोरोनाचं सावट आणि त्यामुळे आलेलं आर्थिक संकट ह्यामुळे सगळ्यांचा आनंदच कुठेतरी हरवला आहे. केदार शिंदेच्या ‘सुखी माणसाचा सदरा’ ह्या लॉकडाऊननंतरच्या पहिल्या नव्या दूरदर्शन मालिकेमधून ते सुख, तो आनंद सापडेल किंवा सापडू दे असं मनापासून वाटतं.”

भरत जाधवला बऱ्याच वर्षांनी पुन्हा छोट्या पडद्यावर आलेलं पाहून छान वाटलं. ह्या सगळ्या अस्वस्थ, अनिश्चिततेच्या वातावरणात तुमचा ‘सुखी माणसाचा सदरा’ रोज किमान अर्धा तास तरी मराठी मनांना ह्या अनिश्चिततेतुन ब्रेक देईल आणि लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणेल…

यासंदर्भात त्यांनी ट्विटरवरती आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे ट्विट पाहिल्यानंतर केदार शिंदेंनी देखील त्यांचे आभार मानले आहेत.

“आणखी काय पोचपावती हवी??? सुख येणार. आपण ते स्वीकारायला तयार हवं”, असा रिप्लाय केदार शिंदे यांनी दिला आहे.

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.