उरण दि २२(विठ्ठल ममताबादे)- अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को गेलार्ड नेल्सन यांनी १९७० मधे अर्थ डे ही सर्वप्रथम संकल्पना मांडली. त्यानुसार २२ एप्रिल हा दिन जागतिक वसुंधरा दिन म्हणुन जगभर साजरा होत असतो. उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने स्थानिक परिसंस्थेला उपयुक्त असणाऱ्या देशी वृक्ष लागवड करुन जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यात आला.
वसुंधरेच्या संरक्षणासाठी कटीबद्ध राहण्याची हीच खरी वेळ आणि अंतिम संधी आहे. त्यामुळे सर्वांनी वाढत्या ग्लोबल वार्मिंगचा विचार करुन आपल्या भावी पिढीसाठी किमान एक व्यक्ती एक झाड लावुन या वसुंधरेला हरित करण्याचा संकल्प करावे असे मत यावेळी संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी यांनी व्यक्त केले.
तसेच संस्थेचे कार्यकर्ते वृक्षमित्र सचिन पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधुन आजच्या ह्या शुभदिनी राष्ट्रीय वृक्ष वड आणि राज्य वृक्ष आंब्याचे रोपन केले. त्याबद्दल संस्थेमार्फत त्यांना निसर्गमित्र सन्मानपत्र देवुन त्यांना सन्मानीत करण्यात आले.
यावेळी वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी, पोलीस अधिकारी सचिन बोठे, मनोहर चवरकर, वसंताताई राजगोपालन, जयप्रकाश मंडल, गणेश मढवी, सचिन पाटील, अमोल कदम, हितेश शिंगरे, वेदांत पाठक, शांताराम ठाकूर, आदी वृक्षमित्र,पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group