chtrapati shivaji maharaj samajik sanstha uran


उरण दि 25(विठ्ठल ममताबादे)- श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांचा विचाराचा, कार्याचा प्रचार प्रसार करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण तर्फे पनवेल तालुक्यातील सर्वोदय वृद्धाश्रम येथे सामाजिक बांधिलकी जपत 100 किलो तांदूळ,20 किलो गहू,10 किलो साखर,10 किलो कांदे अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.



श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे वर्षभर विविध उपक्रम सुरु असतात. वृद्धाश्रमाच्या सुख दुःखात सहभागी होत थोडेफार का होईना त्यांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न, त्यांना मदत करण्याचा प्रयत्न संस्थेने केला आहे.



वृद्धाश्रमातील वृद्धांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या सुख दुःखात सहभागी होत जेष्ठ नागरिकांना अन्न धान्य देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला. यासाठी संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला.



यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे,सल्लागार ऍडव्होकेट गुरुनाथ भगत,सदस्य प्रणय पाटील, साहिल म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, प्रणित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी सर्वोदय संस्थेचे (वृद्धाश्रमाचे )प्रमुख अल्लाउद्दीन शेख यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज ससामाजिक संस्थेच्या कार्यक्रमाचे, उपक्रमाचे कौतुक केले.पनवेल तालुक्यात शांतीवन, स्नेहकुंज, सर्वोदय आदी वृद्धाश्रम असून महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या विचार, तत्व प्रणालीवर चालणाऱ्या संस्था आहेत असे सांगत अल्लाउद्दीन शेख यांनी वृद्धाश्रमाच्या कामकाजाविषयी विविध माहिती संस्थेच्या पदाधिकारी सदस्यांना दिली.उपस्थित सर्वांचे आभार अल्लाउद्दीन शेख यांनी मानले.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.