Tata power plant Khopoli RaigadTata power plant

कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे जनता त्रस्त होती त्यात हल्लीच वाढीव वीजबिले आल्यामुळे जनसामान्य व सेलिब्रिटी यांना राग अनावर झालाय. परंतु वीज कुठून व कशी सुरु झाली याचा विचार केला तर महाराष्ट्रातील पाहिलं वाहिलं जलविद्युत प्रकल्प हे आपल्या रायगड जिल्ह्यात अर्थात खोपोलीमध्ये जमशेदजी टाटा यांच्या नेतृत्वाखाली ९ फेब्रुवारी १९१५ मध्ये सुरु करण्यात आले.

जमशेदजींनी १९०७ साली प्रकल्प बांधण्याकरता परवाना मिळवला आणि १९११ साली काम सुरु होऊन ४ वर्षांच्या कालावधीनंतर १९१५ साली हा प्रकल्प मुंबईत वीज नेण्यासाठी सुरु करण्यात आला.

ब्रिटिश राजवट होती आणि तत्कालीन मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन हा सुद्धा मुंबईत मुबलक वीज यावी या प्रयत्नात होता. जमशेदजी टाटा यांनी प्रकल्प पूर्ण करून एक प्रकारे या ब्रिटिश अधिकाऱ्याचेच काम पूर्णत्वास आणले होते. प्रकल्पाचे उदघाटनसुद्धा गव्हर्नरच्या हस्तेच पार पडले.

विजेची मागणी वाढत असताना पुढील सावधगिरी म्हणून टाटांनी कर्जत जवळ ठोकरवाडीला जलाशय बांधून १९२२ साली वीजनिर्मिती चालू केली.

पहिल्या महायुद्धांनंतर देशात आलेली औद्योगिक तेजी आणि मुंबईतसुद्धा कारखान्यांची वाढ पाहता वीज अजून कमी पडू लागली. मग टाटांनी मुळशी धरण बांधून पाणी भिरा येथे वाळवून तिथे तिसरे विद्युतकेंद्र उभारले.

या प्रकल्पांना औद्योगिक क्रांतीच्या इतिहासात खूप मोठे महत्व प्राप्त झाले.

आपला महाराष्ट्र हा वीजनिर्मितीत भारतातील आघाडीचे राज्य असले तरी औद्योगिकीकरण आणि विजेचा अपव्यय होत असल्यामुळे वीज कमी पडत चालली आहे आणि युनिट दर वाढत चालले आहेत. त्यामुळे गरजेइतकीच वीज वापरणे काळाच्या दृष्टीने महत्वाची आहे.

काळाची गरज ओळखून टाटा कंपनीने आता सोलर पॅनल केंद्र उभारून सूर्याच्या ऊर्जेद्वारे वीज गोळा करण्याचे काम करत आहेत त्यामुळे त्यांच्या दूरदृष्टीला आणि मेहनतीला सलाम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.