harihareshwar-suspicious-boat-raigad-sea-speed-boat-shrivardhan-beach-raigad-maharashtra

रायगड जिल्ह्यात हरिहरेश्वर – श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळली आहे. या बोटीमध्ये दोन ते तीन एके-47 आढळले आहेत. त्याशिवाय हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या घटनेनंतर पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे.



श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि भरडखोल येथील समुद्र किनारी दोन बोटी सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यापैकी हरिहरेश्वर येथील बोटीत दोन तीन एके-47 आढळल्या. त्याशिवाय २०० राउंड्स गोळ्या आढळून आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर, भरडखोल येथील किनाऱ्याजवळ आढळलेल्या बोटीत लाइफ जॅकेट आणि इतर साहित्य आढळून आल्यात. या प्रकरणी कोणतीही व्यक्ती आढळली नाही.



ही बोट ओमान देशातील असल्याची माहिती मिळाली असून या स्पीड बोटीवर आढळून आलेल्या नावाच्या कंपनीची नोंदणी ब्रिटनमधील असल्याचीही माहिती सूत्रांमार्फत मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही स्पीड बोट ओमानजवळ समुद्रात अडकली होती. या बोटीतील व्यक्तींची ओमानजवळच सुटका करण्यात आली होती. त्यानंतर ही बोट त्याठिकाणी नांगर टाकून उभी करण्यात आली होती. त्यानंतर ही बोट समुद्रातून वाहत रायगडजवळ आली असावी अशी माहिती सूत्रांनी दिली. या बोटीचा संबंध दहशतवादी कृत्याशी असावा का, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.



काही स्थानिकांना सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बोट समुद्रात अडकल्याचे दिसून आले. काही स्थानिकांनी या बोटीत काय आहे, याची पाहणी केली. स्थानिकांना रायफल आणि बुलेट्स आढळून आल्या. त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर तहसीलदारांनी आणि स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या बोटीवर असलेल्या रायफलच्या बॉक्सवर एका कंपनीचे नाव दिसून आले. ही स्पीड बोट असल्याची माहिती जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दिली.

रायगडमध्ये समुद्रात बोटीमध्ये काही शस्त्रास्त्र सापडल्यानंतर राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, पालघर या समुद्र किनाऱ्यावरील जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुंबई, पुण्यात नाकेबंदी सुरू करण्यत आली असून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने बोट ताब्यात घेतली आहे. तर, दुसरीकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मुंबईपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर असलेल्या किनाऱ्यावर संशयास्पद बोट शस्त्रांसह आढळून आल्याने गंभीर बाब समजली जात आहे. पोलिसांनी रायगड जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. ATS व इतर सुरक्षा यंत्रणांनी या घटनेकड़े गांभीर्याने लक्ष द्यावा अशी मागणी स्थानिक खासदार सुनील तटकरे, आमदार अदिती तटकरे यांनी केली आहे.



आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.