Alibag incident

अलिबाग तालुक्यात आज मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे, सकाळपासूनच विविध ठिकाणी रस्त्यावर झाडे पडून अपघात होऊन वाहतूक ठप्प झाली आहे. अलिबाग रेवस मार्गावर चोंढी जवळील हॉटेल साईनजवळ सकाळी अकराच्या सुमारास वरसोली येथील उद्योजक नयन कवळे आपल्या चारचाकी वाहनाने एकटेच जात असताना त्यांच्या वाहनावर झाड पडून अपघात झाला, सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही.



मात्र, त्यांच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, यावेळी प्रत्येक संकटसमयी धावून येणारे सामाजिक कार्यकर्ते पिंट्या गायकवाड यांनी अपघात झाल्या झाल्या मित्रमंडळासह घटनास्थळी धाव घेत जेसीबी व इतर साहित्याने पडलेले झाड बाजुला करत वाहनचालकाची सुखरूप सुटका करून ठप्प झालेली वाहतूक पूर्वपदावर आणली. अनेकांनी सतत झाडे उन्मळून पडतात आणि म्हणून टीकाही केली.



यावेळी, त्यांचे सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होता आहे. यावेळी लायन्स क्लब मांडवाचे पदाधिकारी नितीन अधिकारी, सागर पाटील, सुबोध राऊत, दिनेश ठाकूर, धवल राऊत यांच्यासह रवी बेर्डे, नदीम भाई, रोशन नाईक, संतोष पाटील व वैद्य यांनी विशेष सहकार्य केले. घटनास्थळी मांडवा पोलीस साळुंखे व नितीन जगताप यांनी देखील उपस्थित राहून सहकार्य केले. तसेच मांडवा पोलिसांनी पिंट्या गायकवाड यांचे व मित्रमंडळाने तत्परतेने केलेल्या मदतीबद्दल सर्वांचे कौतुक करत आभार मानले.





आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.