“एमपीएससी परिक्षेत ध्येय ठरवुन नेत्रदिपक यश संपादन करणाऱ्या कु.सोनालीचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा”
उतेखोल / माणगांव, दि.१९ जानेवारी (रविंद्र कुवेसकर): माणगांव मधिल सुकन्या, ग्रामसेवक राजेंद्र तेटगुरे यांची मुलगी कु.सोनाली राजेंद्र तेटगुरे, मुळगाव ढालघर, तालुका माणगांव सध्या राहणार वाकडाई नगर हिने, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एम.पी.एस.सी.) परीक्षा चिकाटी, जिद्द व मेहनतीने अभ्यास करत आपले ध्येय निश्चित करुन अव्वल श्रेणीत उत्तीर्ण होत यश संपादीत करुन आपल्या आई वडिलांसह तालुक्याचे तसेच रायगड जिल्ह्याचा नावलौकीक वाढविला आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल माणगांवकरांसह जिल्हाभरातून तिचेवर अभिनंदन, शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या आधी सोनाली हिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे २०१६ साली डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मिळवीत आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पूणे येथील ॲसेंजर या आयटी कंपनीत तीन वर्षे जॉब करून, तिला सतत वाटत होते की एम.पी.एस.सी. करावी या उद्देशाने तिने आपल्या जाॅबचा राजीनामा देऊन अभ्यास सुरू केला. माणगांवचे प्रांत डाॅ.संदिपान सानप, तहसीलदार विकास गारुडकर, मुख्याधिकारी संतोष माळी व तिचे मामा कृषी अधिकारी प्रमोद देशमुख यांनी वेळोवेळी तिला मार्गदर्शन केले.
तिची आई सर्वसामान्य गृहिणी तर वडिल साधे ग्रामसेवक आहेत. एका सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेल्या सोनालीच्या या यशात आईवडिलांची चांगली साथ व भक्कम पाठबळ मिळाले. आणि सोनालीने पहिल्याच प्रयत्नात आपली ध्येयपूर्ती करत स्वप्नंवत यश संपादन केले आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व तरुणाईने सोनालीचा आदर्श घ्यावा व ध्येय निश्चित करुन मेहनत जिद्दीने अभ्यास केला तर आपणही असे यश खेचुन आणु शकतो याचे हे यशस्वी उदाहरणच सोनालीने साकार केले आहे.
Cannot collect videos from this channel. Please make sure this is a valid channel ID.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group
