कोल्हापूरच्या कांबळवाडी गावातील स्वप्निल कुसाळेने एक महत्त्वाचा इतिहास रचला आहे. त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात भारतासाठी कांस्यपदक मिळवले. या ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये भारताचे हे तिसरे पदक ठरले. स्वप्नीलच्या आधी, मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते, आणि नंतर सरबज्योत सिंगसह मनूने 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारातही कांस्यपदक मिळवले. महिला किंवा पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारा स्वप्नील हा पहिला भारतीय नेमबाज ठरला आहे.
स्वप्नीलचे पदक अनपेक्षित होते, कारण त्याला पदकाच्या शर्यतीत कोणीही महत्त्वाचे मानले नव्हते. तरीही, त्याने सर्वांना चकित करत कांस्यपदक मिळवले. रायफल थ्री पोझिशनमध्ये शूटर तीन स्थितींमध्ये निशाणा साधतो. यामध्ये नीलिंग स्थिती (गुडघे टेकून), प्रोन स्थिती (पोटावर झोपून) आणि स्टँडींग स्थिती (उभे राहून) यांचा समावेश होतो. नीलिंग आणि प्रोनपर्यंत स्वप्नील पिछाडीवर होता. परंतु, त्याने स्टँडींग स्थितीतून अप्रतिम पुनरागमन करत पदक गाठले.
स्वप्निल कुसाळेने नीलिंग पोझिशन (गुडघे टेकून शुटींग करणे)च्या पहिल्या फेरीत 50.8 गुण मिळवले, ज्यामुळे तो सातव्या स्थानी राहिला. दुसऱ्या फेरीत त्याची गुण संख्या 101.7 झाली, ज्यामुळे तो सहाव्या स्थानी पोहचला. तिसऱ्या फेरीत त्याने 10.5, 10.4, 10.3, 10.2 आणि 10.2 गुण नोंदवले, आणि यामुळे त्याने सहावे स्थान कायम ठेवले.
प्रोन पोझिशन (झोपून शुटींग करणे)च्या पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या प्रिव्रतस्कीने अचूक स्कोअरसह सुरुवात केली. कुसाळेने तीन वेळा 10.5 आणि दोन वेळा 10.6 गुण मिळवले, ज्यामुळे तो पाचव्या स्थानापर्यंत पोहोचला. दुसऱ्या फेरीतील एका शॉटमध्ये कुसाळेने 10.8 पर्यंत मजल मारली, पण तरीही तो या फेरीच्या अखेरीस पाचव्या स्थानावर राहिला. तिसऱ्या फेरीत त्याने एकदा 10.5, दोनदा 10.4 गुण आणि एकदा 10.2 गुण मिळवले, आणि याफेरीच्या अखेरीसही स्वप्निल पाचव्या स्थानी राहिला.
एमएस धोनी हा माझा आवडता खेळाडू आहे. माझ्या खेळात शांतता आणि संयम महत्त्वाचे असतात. यासाठी मी नेहमी धोनीला आदर्श मानतो. धोनी मैदानावर नेहमीच शांत राहतो. मजेशीर म्हणजे त्यानेही रेल्वेमध्ये टिकट तपासणी अधिकारी म्हणून काम केले आहे, आणि मीही तेच काम करतो.’
महाराष्ट्राने तब्बल ७२ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये केली इतिहासाची पुनरावृत्ती!
पॅरिस ऑलिम्पिक्समधील शूटिंग स्पर्धेत, भारताने ऐतिहासिक कामगिरी करत कांस्यपदक जिंकले आहे. ५० मीटर रायफल थ्री पोझिशन या कठीण स्पर्धेत, महाराष्ट्राचे स्वप्निल कुसाळे यांनी आपले कौशल्य सिद्ध करून दाखवले. या विजयाने, महाराष्ट्राने १९५२ पासून ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक मिळवण्याची ७२ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. खाशाबा जाधव यांनी १९५२ मध्ये पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून महाराष्ट्राचे नाव उंचावले होते आणि आता कुसाळे यांनी त्यांच्या यादीत आपले नाव नोंदवले आहे.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group